Ketaki Chitale:पुढे काय होणार? जामिनानंतरही केतकी चितळे तुरुंगातच, नेमका कोणत्या प्रकरणात झाला जामीन? 22 ठिकाणी एफआयआर, कधी होणार सुटका?
आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणात केतकीला अटक झाल्यानंतर, ठाणे कोर्टात गुरुवारी अट्रोसिटी प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात तिला जामीन मिळाला आहे. आता कळवा येथे आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर २१ तारखेला सुनावणी होणार असून या प्रकरणात तिला जामीन मिळाल्यास पुढे काय होणार हा प्रश्न आहे.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह पोस्ट (facebook post)प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale)हिला जामीन मंजूर करण्यात आला असला तरी अद्याप तिची सुटका करण्यात आलेली नाही. केतकीला आज मिळालेला जामीन हा तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एट्रोसिटी प्रकरणातील होता. 2020सालच्या या प्रकरणात गुरुवारी तिला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणात केतकीला अटक झाल्यानंतर, ठाणे कोर्टात गुरुवारी अट्रोसिटी प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात तिला जामीन मिळाला आहे. आता कळवा येथे आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर २१ तारखेला सुनावणी होणार असून या प्रकरणात तिला जामीन मिळाल्यास पुढे काय होणार हा प्रश्न आहे.
राज्यात 22 ठिकाणी केतकीविरोधात एफआयआर दाखल
शरद पवार यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकीविरोधात राज्यात 22 ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे २१ तारखेच्या सुनावणीत तिला जामीन मिळाल्यानंतर तिला पुन्हा इतर ठिकाणेचे पोलीस अटक करणार का, हाही प्रश्न आहे. मात्र निखिल भामरे आणि केतकी यांच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने एकाच प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेल्या एफआयआरची माहिती गृह विभागाला आहे का अशी विचारणा केली होती. तसेच सरकारला या प्रकरणी सुानवलेही होते. शरद पवारांसारख्या मान्यवर नेत्यालाही अशा प्रकरणात इतके दिवस आरोपी अटकेत आहे, हे पटमार नाही, असे मत कोर्टाने नोंदवले होते. त्यामुळे आता कळवा प्रकरणात 21 तारखेला तिला जामीन मिळाल्यानंतर, 22 तारखेला तिची सुटका होण्याची शक्यता आहे. पुन्हा तिला त्याच प्रकरणात अटक होण्याची शक्यता कमी असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.
केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस
दरम्यान आक्षएपार्ह पोस्ट प्रकरणात केतकीला अद्याप जामीन मिळालेला नसल्याने हे प्रकरण केंद्रीय महिला आयोगाक़डे गेले आहे. या प्रकरणात केंद्रीय महिला आयोगाने पोलीस महासंचालक रजनीश शेठी यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात दिल्लीत हजर राहण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.
काय होते एट्रोसिटी प्रकरण
ज्या प्रकरणात केतकीला जामीन मिळालेला आहे ते प्रकरण 2020 सालातील आहे. 1मार्च 2020 रोजी तिची एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये धर्माचा उल्लेख केल्याने या पोस्टवर आक्षेप घेत तिच्याविरोधात एट्रोसिटीचा गन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात तिला जामीन मंजूर झाला आहे.