CDR म्हणजे काय?, कुणाला मिळतो?; फडणवीसांना कसा मिळाला?

राज्याच्या विधानसभेत आज मनसुख हिरेन प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. (what is call detail record or cdr? who can have access to cdr?)

CDR म्हणजे काय?, कुणाला मिळतो?; फडणवीसांना कसा मिळाला?
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 4:22 PM

मुंबई: राज्याच्या विधानसभेत आज मनसुख हिरेन प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांचा सीडीआर, हिरेन यांच्या पत्नीचा कबुली जबाब आदी गोष्टींचा उल्लेख  करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडंल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हिरेन यांचा सीडीआर फडणवीसांनी कुठून मिळवला? असा सवाल केला. त्यामुळे सभागृहात चांगलीच खडाजंगी उडाली. हा सीडीआर नेमका काय आहे? तो कसा मिळवला जातो?, त्यावर टाकलेला हा प्रकाश… (what is call detail record or cdr? who can have access to cdr?)

सभागृहात नेमकं काय झालं?

एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. तेव्हा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) कसे मिळाले, त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. नाना पटोले यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस ताडकन उभे राहिले आणि सरकारने माझी चौकशी करावीच, असे खुले आव्हान दिले. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा. पण खून केला त्याला पाठिशी का घालता? तुम्ही मला चौकशी लावण्याची धमकी देत आहात का? सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही माझी चौकशी लावा. मात्र, याप्रकरणात तुम्ही शोधणार नाही, त्यापलीकडची माहिती मी मिळवून दाखवतो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ललकारले.

सीडीआर म्हणजे काय?

सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड. हा एक प्रकारचा मेटाडेटा असतो. म्हणजे ते तुमचं एकप्रकारचं संपूर्ण संभाषण असतं. तुम्ही कुणाशी बोलला? कितीवेळ बोलला? किती बोललात? या सर्व माहितीचं रेकॉर्ड म्हणजे सीडीआर असतो. फोन कोणत्या क्रमांकावरून केला गेला आहे. कोणत्या क्रमांकावर केला आहे. किती वेळा कॉल रिसीव्ह केला गेला आहे. कॉल सुरू होण्याची वेळ. कॉलचा एकूण कालावधी याची माहिती ही यात असते. त्याशिवाय किती नंबरांवर मेसेज पाठवण्यात आले. कोणत्या नंबरावरून मेसेज पाठवण्यात आले. किती मेसेज रिसीव्ह करण्यात आले. याचीही डिटेल यात असते.

मात्र, पाठवलेल्या एसएमएसमध्ये आणि रिसीव्ह केलेल्या एसएमएसमध्ये काय लिहिण्यात आलं आहे याचा रेकॉर्ड असतं नाही. विशेष म्हणजे कॉल कुठून केला गेला याची माहितीही सीडीआरमध्ये असते. म्हणजे फोन करणाऱ्याचं लोकेशनही कळतं. तसेच ज्याला कॉल केला गेला त्याचंही लोकेशन कळतं. फोन कट कसा झाला? नॉर्मल कट झाला की कॉल ड्रॉप झाला याचीही माहिती मिळते.

CDR कुणाला मिळतो?

कायदेशीररित्या कुणालाही सीडीआर मिळत नाही. सीबीआय, आयटी, इंटेलिजन्स ब्युरो, पोलीस, एनआयए, एटीएस, एनसीबी आणि जेवढ्या चौकशी यंत्रणा आहेत. त्या सर्वांना चौकशीच्या दरम्यान सीडीआर मिळतो. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना परवानगी घ्यावी लागते. 2014मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सेक्युरीटी अँड एक्सचेंड बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीला सीडीआर अॅक्सेसची परवानगी दिली होती. मार्केटमधील फ्रॉडची चौकशी होण्यासाठी ही परवानगी देण्यात आली होती.

नियमानुसार, एसपी, डीसीपी रँकचे अधिकारी चौकशी सुरू असलेल्या व्यक्तीच्या सीडीआरसाठी मोबाईल नेटवर्कवाल्या कंपनीच्या नोडल ऑफिसरकडे मागणी करू शकतात. ज्या व्यक्तीचा सीडीआर हवा असतो त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर पोलीस स्टेनशकडून सीडीआर मागवण्याचा अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांना पाठवला जातो. त्यानंतर अधिकार असलेला अधिकारी संबंधित मोबाईल कंपन्यांना पत्र लिहून संबंधित व्यक्तीच्या सीडीआरची चौकशी करते. त्यानंतर कंपन्यांकडून संबंधित अधिकाऱ्याला मेल केला जातो.

जुगाड करून सीडीआरची माहिती

दरम्यान, काही लोक जुगाड करून सीडीआर मिळवत असल्याचंही दिसून येत आहे. डिटेक्टिव्ह आणि इतर लोक यात यशस्वी होत आहेत. वकिलांनाही आपली केस मजबूत करायची असते. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपनीची अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी तेही प्रयत्न करत असतात. शिवाय विमा कंपन्याही काहीवेळेला संबंधित व्यक्तीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे जुगाड करून सीडीआर मिळवणारे लोक अशा कंपन्यांच्या उपयोगी पडतात.

CDR कधी मिळतो?

एखादा गंभीर गुन्हा घडल्यास, म्हणजे दहशतवादी घटना, बड्या व्यक्तीची हत्यास, बलात्कार, आरोपी फरार झाला असेल आणि त्याला तात्काळ अटक करण्याची गरज असेल तर मेल केल्यानंतर संबंधित कंपन्यांकडून अर्ध्या तासात सीडीआर मिळतो. तर सर्वसाधारण केसमध्ये दोन आठवड्यात सीडीआर मिळतो. साधारणपणे मोबाईल कंपन्यांकडून एक वर्षापासूनचा सीडीआर देतात. त्यापूर्वीचाही सीडीआर हवा असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज असते.

कॉल डिटेलमधून योग्य लोकेशनची माहिती मिळते का?

कोणत्याही व्यक्तीच्या लोकेशनची माहिती मोबाईल टॉवरद्वारे मिळवली जाते. सीडीआरमध्ये टॉवर नंबरचा उल्लेख असतो. कॉल करताना ज्या टॉवरमधून नेटवर्क मिळालं, त्या टॉवरचा लोकेशन नंबरची माहिती मिळते. एक मोबाईल टॉवर साधारणपणे 500 मीटरच्या रेडियसला कव्हर करतो. जीपीएस अॅपद्वारे त्या 500 मीटरच्या परिसरातून कॉल करणाऱ्या व्यक्तीचं प्रत्यक्ष लोकेशन पोलीस शोधून काढतात.

CDR कोर्टात मान्य होतो का?

पुरावा कायदा 1872 च्या कलम- 65Bच्या अन्वये इलेक्ट्रॉनिक रिकॉर्डला पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो. आरोपपत्रासोबत हा पुरावा द्यावा लागतो. पुराव्यासोबत कोणतीही छेडछाड केली नसल्याचं आरोपपत्रात नमूद करणं बंधनकारक असतं. (what is call detail record or cdr? who can have access to cdr?)

फडणवीसांना सीडीआर कसा मिळाला?

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. आता ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचं पद अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे चौकशी यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून त्यांनी सीडीआर मिळवला असल्याची शक्यता आहे. मात्र, हा सीडीआर कसा मिळवला याबाबत फडणवीस यांनी काहीच भाष्य केलेलं नाही. (what is call detail record or cdr? who can have access to cdr?)

संबंधित बातम्या:

Maharashtra budget session day 7 Live | फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले,आम्ही चौकशी करतोय : अनिल देशमुख

Mansukh Hiren death : भर सभागृहात चिरफाड, देवेंद्र फडणवीसांचा शब्द आणि शब्द, जसाच्या तसा!

Mansukh Hiren Death Case : मनसुख हिरेन, मोहन डेलकर, सचिन वाझे ते फडणवीसांना धमकी? विधानसभेत नेमकं काय घडलं?

(what is call detail record or cdr? who can have access to cdr?)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.