Jalgaon Rape Case | जळगावची धनिक बाळे, करती अश्लील चाळे, महाराष्ट्राला हादरवणारं सेक्स स्कँडल काय होतं? वाचा सविस्तर

जुलै 1994 मध्ये उघडकीस आलेल्या जळगाव बलात्कार प्रकरणामुळे फक्त जळगाव जिल्हा किंवा महाराष्ट्रच नाही, तर संबंध देश हादरुन गेला होता (What is Jalgaon Rape Case )

Jalgaon Rape Case | जळगावची धनिक बाळे, करती अश्लील चाळे, महाराष्ट्राला हादरवणारं सेक्स स्कँडल काय होतं? वाचा सविस्तर
लैंगिक शोषण (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 5:16 PM

मुंबई : जळगावातील शासकीय वसतिगृहात पोलिसांनी तरुणी, महिला यांना निर्वस्त्र करुन नाचण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या निमित्ताने जळगावातच घडलेल्या तब्बल 27 वर्ष जुन्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. जळगाव बलात्कार प्रकरण (Jalgaon Rape Case) किंवा जळगाव सेक्स स्कँडल (Jalgaon sex scandal) या नावाने ही केस गाजली होती. किमान 5 ते 12 वर्ष चालू राहिलेल्या स्कँडलमध्ये 300 ते 500 महिला अडकल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे या रॅकेटच्या माध्यमातून व्हीआयपी बिझनेसमन, राजकारणी, गुन्हेगार यांनी महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप होता. (What is Jalgaon Rape Case Jalgaon Women’s Hostel Exploitation Scandal 1994 infamous case)

जुलै 1994 मध्ये उघडकीस आलेल्या जळगाव बलात्कार प्रकरणामुळे फक्त जळगाव जिल्हा किंवा महाराष्ट्रच नाही, तर संबंध देश हादरुन गेला होता. ‘जळगावची धनिक बाळे, करती अश्लील चाळे’ असे मथळे त्याकाळी छापले गेले होते. देह व्यापार, बलात्काराच्या प्रकरणात बहुतांश शाळकरी विद्यार्थिनी अडकल्या होत्या. भुलवून, प्रसंगी ड्रग्ज देऊन त्यांच्या बलात्कार झाले होते, त्यानंतरही अनेक महिने त्यांना छळलं जात असे.

मुलींना जाळ्यात कसं अडकवलं जात होतं?

कॉलेज कॅम्पस, ब्युटी पार्लर, आईस्क्रिम पार्लर, हॉस्पिटल किंवा बस स्थानकांवर शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी, महिलांना हेरलं जायचं. त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात. त्यांचे नग्नावस्थेत फोटो काढले जात असत. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात असे. या तरुणींना नंतर बिझनेसमन, राजकारणी यासारख्या उच्चभ्रू लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात असे. थोडक्यात ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात.

पीडितांनी हिमतीने आवाज उठवला

1993 मध्ये काही तरुणींनी हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक दीपक जोग यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यानंतर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. राज्याच्या विविध भागात महिला संघटनांनी आंदोलनं केली. या प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा आणि आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी उचलून धरली. जळगाव नगर परिषदेतील काँग्रेसचे तत्कालीन सदस्य पंडित सपकाळे, राजू तडवी यांचं नाव या प्रकरणात गुंतल्याचीही चर्चा होती.

पुण्यात विशेष न्यायालयाची स्थापना

जळगावात अरविंद इनामदार, मीरा बोरवणकर, दीपक जोग यांच्या अध्यक्षतेत विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली. आरोपपत्र दाखल करण्यात आलं. पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करुन जज मृदुला भाटकर यांनी सुनावणी घेतली. 1995 मध्ये पुरावे तपासण्यास सुरुवात झाली.

जळगाव आणि भुसावळमध्ये मिळून 12 बलात्कारांसह वीस लैंगिक अत्याचाराच्या केस नोंदवण्यात आल्या. काही पीडिता अवघ्या 12 वर्षांच्या होत्या. बहुतांश पीडित तरुणी या गरीब कुटुंबातील होत्या. खरं तर या स्कँडलमध्ये किमान 300 ते 500 महिला अडकल्याचं बोललं जातं. परंतु बदनामीच्या भीतीने असंख्य पीडिता समोरच न आल्याचा अंदाज आहे.

डॉक्टर, वकील, राजकीय नेत्यांचे हातही बरबटलेले

जळगाव नगर परिषदेतील शिवसेनेचे दोन तत्कालीन सदस्य, एक डॉक्टर, वकील, रेडिओ स्टेशन कर्मचारी, लॉज मालक यांचा मुख्य आरोपींमध्ये समावेश होता. स्थानिक काँग्रेस नेते सुरेशदादा जैन यांचं नावही या प्रकरणात गुंतल्याचा दावा काही माध्यमांनी केला. परंतु, त्यांनी आपल्यावरील आरोप नाकारले.

…म्हणून केस कमकुवत ठरली

“तक्रारी उशिरा नोंदवल्या गेल्या, हा मुख्य अडथळा ठरला. एफआयआर दाखल होईपर्यंत एक वर्ष उलटलं होतं. त्यामुळे वैद्यकीय अहवालाची कमतरता होती. आरोपपत्र दाखल करतानाच केस कमकुवत असल्याची आम्हाला कल्पना होती. तरीही आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला” अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी दिली होती. (What is Jalgaon Rape Case Jalgaon Women’s Hostel Exploitation Scandal 1994 infamous case)

मुख्य आरोपीची चार वर्षांनी सुटका

तपासकामात पोलिसांना पीडित तरुणींचे आक्षेपार्ह फोटो सापडले. 1997 मध्ये विशेष न्यायालयाने वीसपैकी पाच केसमध्ये आरोपींना शिक्षा सुनावली. 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य आरोपी आणि काँग्रेस नेता पंडित ओमकार सपकाळे याची मुक्तता केली. तोपर्यंत त्याने चार वर्षांचा कारावास भोगला होता. सपकाळेविरोधातील पुरावे नैसर्गिक आणि विश्वसनीय नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं.

पंडित सपकाळेच्या सुटकेनंतर हजारो महिलांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. सपकाळेला पुन्हा जळगावात प्रवेश देऊ नये, अशी लेखी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. आरोपीच्या प्रतिमेचं दहनही त्यावेळी करण्यात आलं. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचं आश्वासन दिलं होतं.

जळगावच्या सरकारी महिला हॉस्टेलमध्ये नेमकं काय घडलं? पीडितेची आपबिती

 

संबंधित बातम्या :

पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचायला लावलं, महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार

(What is Jalgaon Rape Case Jalgaon Women’s Hostel Exploitation Scandal 1994 infamous case)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.