Solapur Youth Drowned : सोलापूरमध्ये हरणा नदीत तरुण बुडाला; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
मृत शौकत नदाफ हा कामावरून घरी परतत असताना नदीच्या पाण्यात पडला. पोहता येत असताना देखील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. जर नदीवर पूल असता तर ही घटना घडलीच नसती.
सोलापूर : दक्षिण सोलापुरातील मुस्ती गावानजीक असलेल्या हरणा नदीत बुडून (Drowned) एका तरुणाचा मृत्यू (Death) झाला आहे. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरुण नदी ओलांडून येत असताना पाण्यात बुडाला. शौकत नदाफ असे या मृत तरुणाचे नाव आहे. मात्र मुस्ती गावातून जाणाऱ्या हरणा नदीवर अद्यापही पूल (Bridge) नसल्याने जीव मुठीत घेऊन गावकरी नदी ओलांडून जातात. त्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आम्ही वारंवार प्रशासनाकडे याबाबत पूलाची मागणी करुनही पूल न झाल्यानेच ही घटना घडलीय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ आम्ही मृत शौकत नदाफचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मुस्ती ग्रामस्थांनी घेतलाय.
मागणीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मृतदेह न घेण्याची भूमिका
मृत शौकत नदाफ हा कामावरून घरी परतत असताना नदीच्या पाण्यात पडला. पोहता येत असताना देखील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. जर नदीवर पूल असता तर ही घटना घडलीच नसती. त्यामुळे हरणा नदीवर तात्काळ पूल बांधण्याची प्रक्रिया सुरु व्हावी. तसेच या मृत्यूला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थ आणि मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे. (While crossing the river in Solapur, the youth drowned in Harna river)