AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who is Mansukh Hiren : मनसुख हिरेन यांची हत्या की आत्महत्या? ते कोण होते? फडणवीस, गृहमंत्री देशमुख आणि मुलगा काय म्हणतो?

मनसुख हिरेश यांनी खरंच आत्महत्या केली की त्यांच्या मृत्यूमागे घातपात आहे?, याची चर्चा आता सुरु झाली आहे.

Who is Mansukh Hiren : मनसुख हिरेन यांची हत्या की आत्महत्या? ते कोण होते? फडणवीस, गृहमंत्री देशमुख आणि मुलगा काय म्हणतो?
मनसुख हिरेन
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 7:21 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर जी स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती तिचा मालक कोण असा शोध सुरु झाला आणि काही तासाच्या आत ती गाडी मनसुख हिरेन (mansukh Hiren) यांची असल्याचं उघड झालं. गाडीवरची नंबर प्लेट नकली होती, पण गाडी कुणाच्या नावावर आहे हे शोधायला पोलीसांना वेळ लागला नाही. ठाण्याच्या मनसुख हिरेन यांनी ती गाडी स्वत:ची असल्याचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी त्यासाठी ते पोलीसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले. गाडी सापडली याची जेवढी चर्चा झाली तेवढीच गाडीमालकाचीही झाली. तेव्हापासून मनसुख हिरेन हे नाव चर्चेत आलं. (Who is mansukh Hiren Found Dead body Owner of Scorpio With Explosive Found Near mukesh Ambani House)

कोण आहेत मनसुख हिरेन?

मनसुख हिरेन यांनी जे प्रतिज्ञापत्र पोलीसात दाखल केलं आहे आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी जे वाचून दाखवलं त्यानुसार- मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईलच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय करत होते. तीन मुलं आणि पत्नीसह ते ठाण्यात रहात होते. पत्नीचं नाव विमला आहे. त्यांचं वय 43 वर्षे. तीनही मुलांची वय हे 13 ते 20 वर्षाच्या दरम्यान आहे. सध्याच्या ठिकाणी ते 2005 सालापासून रहात आहेत.

गाडीचे खरे मालक कोण?

जी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली, तिच्या खऱ्या मालकावरुन वाद आहे. फडणवीसांनी पोलीसांचं जे प्रतिज्ञापत्र सभागृहात वाचून दाखवलं, त्यानुसार हिरेन यांनी संबंधीत गाडी ही 2018 साली सॅम पीटर न्यूटन यांच्याकडून विकत घेतली होती. तर गृहमंत्री देशमुख यांच्या निवेदनानुसार हिरेन हे गाडीचे मुळ मालक नाहीत तर सॅम पीटर न्यूटन हे खरे मालक आहेत. सध्या ती गाडी फक्त हिरेन यांच्या ताब्यात होती. हिरेन यांनी त्या गाडीचं इंटेरिअर डिझानचं काम केलं होतं. त्याचं बिल काही दीड दोन लाख रुपये झाले होते. ते जोपर्यंत दिलं जात नाही तोपर्यंत गाडी परत देणार नाही अशी भूमिका हिरेन यांनी घेतली होती अशी गृहमंत्र्यांची माहिती आहे. याच माहितीवरुन सभागृहात फडणवीस आणि देशमुख यांच्या काहीसा वादही झाला.

हिरेन यांच्या मुलाचं काय म्हणण आहे?

मिळालेल्या माहितीनुसार मनसुख हिरेन हे काल रात्री सव्वा आठच्या सुमारास घराबाहेर पडले आणि ते परतलेच नाही. ते पायी घराबाहेर गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान एक ऑडिओ क्लिप हिरेन यांच्या मुलाची व्हायरल होते आहे. त्यानुसार हिरेन यांना पोहता येत होतं आणि ते आत्महत्या करण्याची शक्यताही कमी असल्याचही मुलगा म्हणतो. मित हिरेन असं मुलाचं नाव आहे. हा घातपात असावा असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

हिरेन यांच्या घातपाताचा फडणवीसांना संशय?

सभागृहात निवेदन करताना फडणवीसांनी हिरेन यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हिरेन यांचा फोटो मी पाहिला आहे आणि त्यात हिरेन यांचे हात मागे बांधल्याचं फडणवीस म्हणाले आणि अशी कुणी आत्महत्या करु शकत नाही असही फडणवीसांनी सांगितलं. तर हिरेन यांच्या शरीरावर कुठलेही घाव नाहीत आणि जे काही असेल ते पोस्टमार्टममध्ये सिद्ध होईल, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.

 मुकेश अंबानींच्या घराबाहेरील संशयित स्कॉर्पिओच्या मालकाचा मृतदेह

हे ही वाचा :

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

Video: जिथं ‘त्या’ स्कॉर्पिओच्या मालकानं आत्महत्या केली तिथला व्हिडीओ जशास तसा

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....