Who is Sachin Vaze : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप, कोण आहेत सचिन वाझे?

सचिन वाझे (Who is Sachin Vaze) हे गेल्यावर्षी तब्बल 16 वर्षांनी पोलीस दलात परतले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे.

Who is Sachin Vaze : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप, कोण आहेत सचिन वाझे?
sachin waze
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 1:25 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्याच्या डीसीपींनी ही माहिती दिली. मनसुख हिरेन (Mansukh Hiren)  असं स्कॉर्पिओ मालकाचं नाव आहे. मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.  या धक्कादायक प्रकारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंबानी प्रकरणातील तपास अधिकारी IO सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.   (Devendra Fadnavis rais question on IO Sachin Vaze in Mansukh Hiren suicide case Mukesh Ambani bomb scare)

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार 9 मार्चला मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब भर सभागृहात वाचून दाखवला. त्यावरुन पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अजूनही अटक का केलेली नाही, असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी पाच मार्चला विधानसभेतच सचिन वाझेंचं नाव घेतलं होतं.

सचिन वाझे हे गेल्यावर्षी तब्बल 16 वर्षांनी पोलीस दलात परतले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना घरात घुसून उचलणारे अधिकारी सचिन वाझे हेच होते.

क्राईम ब्रँचच्या सीआययू युनिटचे एपीआय सचिन वाझे हे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास करत होते. मात्र दोन दिवसापूर्वीच त्यांच्याऐवजी हा तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला.

कोण आहेत सचिन वाझे?

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले .

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.

मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. (Sachin Vaze Reinstated in Crime Branch)

सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली.

सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.

अर्णब गोस्वामी यांना घरातून उचललं

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकऱणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना घरातून उचललं होतं. त्यावेळी सचिन वाझे राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत होते.

सचिन वाझे यांची कारकीर्द

सचिन वाझे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते

सचिन हिंदुराव वाझे यांचा जन्म 22 फेब्रवारी 1972 रोजी झाला

वाझे हे 1990 मध्ये पोलीस दलात भरती झाले

त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात उप – निरीक्षक पदापासून झाली

वाझे यांचं ट्रेनिंग ते पहिली पोस्टिंग नक्षलभागात होती.

अवघ्या दोन वर्षात 1992 मध्ये त्यांची बदली ठाण्यात झाली.

संबंधित बातम्या

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.