कंपनीच्या सीईओने का केली आपल्याच मुलाची हत्या? पाहा महिला पोलिसांच्या जाळ्यात कशी अडकली
एका कंपनीत मोठ्या पदावर् असलेल्या सुचना सेठने आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या कशी केली. इतकं असं काय घडले की तिने इतके टोकाचे पाऊल उचलले. पोलीस देखील या घटनेने हादरले आहे. ४ वर्षाच्या मुलाची हत्या करण्याची हिंमत कशी झाली. याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. महिलेने अजूनही हत्या केल्याची कबुली दिलेली नाही.
पणजी : गोव्यात चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी आईला पोलिसांनी अटक केली आहे. एका कंपनीची सीईओ असलेल्या या महिलेने असे पाऊल का उचलले हे आता समोर येऊ लागलं आहे. पण या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. कारण एक आई आपल्या मुलाला कशी मारु शकते असा प्रश्न लोकं उपस्थित करत आहेत. आरोपी महिलेची पोलीस चौकशी करत आहेत. शनिवारी पोलीस महिलेला घेऊन त्याच हॉटेलमध्ये पोहोचले जेथे तिने मुलाची हत्या केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी नेल्यानंतर महिलेने अनेक नवे खुलासे केले आहे. ज्यामुळे हत्येमागचा हेतू स्पष्ट होताना दिसत आहे.
आरोपी सुचना सेठने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील सांगितले. महिलेने अजूनही आपल्या मुलाचा खून केल्याचे मान्य केलेले नाही.
महिलेने का केली मुलाची हत्या
काही दिवसांपूर्वी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली होती. ज्यामध्ये तिने पतीसोबत बिघडलेले संबंधाबद्दल लिहिले होते. पतीसोबत भांडण झाल्यानंतर सूचना सेठ मुलाला घेऊन एका हॉटेलमध्ये गेली. हॉटेलच्या खोलीतच तिने मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे.
महिला पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीये. तिला तिने केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप झालेला दिसत नाही. महिलेने 6 जानेवारीला कँडोलिममधील एका हॉटेलमध्ये 8 जानेवारीपर्यंत राहिली. या दरम्यानच तिने मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी ती मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी असे घेतले ताब्यात
हॉटेलचे कर्मचारी जेव्हा खोली साफ करण्यासाठी गेले तेव्हा टॉवेलवर त्यांना रक्ताचे डाग दिसले. कर्मचार्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताना पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तेव्हा मुल बाहेर जाताना तिच्यासोबत दिसलं नाही. पोलिसांनी लगेच संशय आला. पोलिसांनी टॅक्सी चालकाला संपर्क केला आणि गाडी सरळ जवळच्या पोलीस स्टेशनला आणण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाई सुरु झाली.