मुंबईची लाईफ लाईन का झालीय डेथ लाईन, वर्षभरात 100 जणांनी आपले आयुष्य संपविले

लोकलचा प्रवास करताना दरवर्षी विविध कारणांनी अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू होत असतो. परंतू आता लोकलसमोर स्वत:ला झोकून देत जीवन संपविण्याचे प्रकार वाढले आहेत.

मुंबईची लाईफ लाईन का झालीय डेथ लाईन, वर्षभरात 100 जणांनी आपले आयुष्य संपविले
LOCALImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 11:38 AM

मुंबई : मुंबईची लाईफ लाईन अलिकडे नैराश्याने ग्रासलेल्या लोकांसाठी डेथ लाईन बनली आहे. मुंबई उपनगरीय लोकलचे वेळापत्रक हल्ली या कारणामुळेही वारंवार होत आहे विस्कळीत, जीवनाला कंटाळलेले लोक हल्ली लोकलच्या समोर येऊन आपले आयुष्य संपवित आहेत. गेल्यावर्षी 1 जानेवारी 2021  ते 31 डिसेंबर 2022 या वर्षभरात तब्बल 100 जणांनी लोकलखाली आत्महत्या केल्याची माहीती आरटीआयमधून उघडकीस आली आहे.

मु्ंबईची जीवनवाहीनी ठरलेल्या उपनगरीय लोकलचा प्रवास करताना दरवर्षी विविध कारणांनी अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू होत असतो. तर तितकेच प्रवासी जखमी होत असतात. गेल्या वर्षभरात 2507 जणांचा लोकलप्रवासात बळी गेला आहे. यातील काही अपघात प्रवाशांच्या चुकीमुळे तर काही अपघात रेल्वे प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधामुळे होत असतात. उपनगरीय रेल्वेमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू हे रूळ ओळांडतानाच होत असतात. त्यानंतर लोकलमधून पडून प्रवाशांचा मृ्त्यू होत असतो. परंतू अलिकडे लोकल ट्रेनखाली आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

सर्वाधिक आत्महत्या कल्याण स्थानकात

गेल्या वर्षभरात तब्बल 100 जणांनी लोकलखाली उडी मारून आत्महत्या केल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे. यात सर्वाधिक आत्महत्या कल्याण स्थानकात झाल्या आहेत. त्याखालोखाल पालघरमध्ये 15 जणांनी आत्महत्या केली आहे. मध्य रेल्वेवर 72 जणांनी तर पश्चिम रेल्वेवर 28 जणांनी लोकलखाली येऊन आपले आयुष्य संपवल्याचे उघडकीस आले आहे.

कल्याण – 44

पालघर – 15

ठाणे – 8

डोंबिवली – 8

मुंबई सेंट्रल – 5

वांद्रे – 4

जगातील मोठे नेटवर्क

मुंबई उपनगरीय लोकलचा ट्रॅक हा अलिकडे आत्महत्या करणाऱ्यांचा आवडता स्पॉट झाला आहे. मुंबई लोकलचे नेटवर्क जगात सर्वाधिक वर्दळीचे आहे, मुंबईत कोविडकाळापूर्वी दररोज 75  लाख प्रवासी लोकलने प्रवास करीत होते. मुंबईत दररोज तीन हजाराहून अधिक लोकल फेऱ्या होत असतात.

लोकल सेवेला याचा फटका

मुंबईत लोकल पकडताना पडणाऱ्या प्रवाशांना आरपीएफ आणि जीआरपी तसेच सुरक्षा रक्षक आपला जीव धोक्यात घालून वाचवत असतात. तसेच रेल्वे रूळांसमोर येऊन आत्महत्या केल्याने ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत होत असते. त्यामुळे एक लोकल रखडली तर पिकअवरला सगळ्याच लोकलला याचा फटका बसतो. शिवाय आत्महत्या करणाऱ्या देह अडकून बसल्याने गाड्या रखडत असतात. वाढत्या शहरी करणामुळे मुंबईत लोकल ट्रक भोवती किंवा स्थानकांभोवती तटबंदी नसल्याने कोणी प्रवेश करीत असल्यानेही मुंबईत अशा घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर आहे.

 रूळ ओलांडताना  1,118 जणांचा मृत्यू ( 425 पुरूष आणि 39 महिला )

लोकलमधून पडून वर्षभरात 700 प्रवाशांचा मृत्यू ( मध्य रेल्वे 520 आणि पश्चिम रेल्वे 190 )

आजारपणामुळे नैसर्गिक मृत्यू – 631  ( 466 पुरूष आणि  65 महिला )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.