प्रेमाचं प्रतिक असलेलं ताजमहल बघायचंय म्हणत पत्नीनं फसवलं, प्रियकरासोबत कट रचून निघृण हत्या

उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात एका 20 वर्षीय पत्नीने आपल्या पतीची फसवणूक करत निघृणपणे हत्या केली (Wife killed husband in Mathura).

प्रेमाचं प्रतिक असलेलं ताजमहल बघायचंय म्हणत पत्नीनं फसवलं, प्रियकरासोबत कट रचून निघृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 8:25 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात एका 20 वर्षीय पत्नीने आपल्या पतीची फसवणूक करत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Wife killed husband in Mathura). पतीचा मृचदेह 16 डिसेंबर रोजी यमुना एक्सप्रेसवे येथील राया कट परिसराजवळ मिळाला. सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटणे कठीण होतं. मात्र, खिशात सापडलेल्या फोटोमुळे पोलिसांना संबंधित व्यक्तीची ओळख पटली. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर प्रेम संबंधातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीची हत्या त्याच्या पत्नीने प्रियकरासोबत कट रचून केली आहे. मृतक व्यक्तीचं नाव शिवकुमार असं आहे. तो 22 वर्षांचा होता. तर त्याची पत्नी पूनमचं वय 20 वर्ष इतकं आहे. ते दोघं पती-पत्नी 14 डिसेंबर रोजी आग्रा फिरायला आले होते. मात्र, आग्राहून परतत असताना पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली (Wife killed husband in Mathura).

पत्नीचे चुलत भावासोबत अनैतिक संबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमारची पत्नी पूनमचं लग्नाआधी तिचा चुलत भाऊ संदीपसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या तीन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. याच काळात पूनमचं शिवकुमारसोबत लग्न झालं. लग्नापासूनच पूनम आपल्या पतीची हत्या करण्याच्या विचारात होती.

पूनमने पती शिवकुमारकडे आग्रा आणि ताजमहल पाहण्याचा हट्ट केला. अखेर तिच्या हट्टाला बळी पडून तो आग्रा जाण्यास तयार झाला. आग्रा आणि ताजमहल बघितल्यानंतर पुन्हा आपल्या गावाकडे परतत असताना पूनमने आपला प्रियकर संदीपसोबत मिळून पती शिवकुमारची दगडाने ठेचून हत्या केली.

त्यानंतर 16 डिसेंबर रोजी राया कट परिसराजवळ अज्ञात मृतदेह आढळ्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसएसपी डॉक्टर गौरव ग्रोवर यांनी एसपी देहात श्रीश चंद यांच्या नेतृवात एक पथक तयार केलं. या पथकने दोन दिवसात पूनम आणि तिचा प्रियकर संदीप यांना अलीगढ येथून अटक केली.

हेही वाचा :

मित्राच्या शरीराचे 11 तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले, खुनी नवरा-बायकोला बेड्या

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.