Extramarital affair | विचित्र प्रेम! बायकोवरच्या प्रेमासाठी तिच्या बॉयफ्रेंडला सोबत घरी ठेवलं, अखेर नको तेच घडलं

Extramarital affair | पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजल्यानंतर मर्यादेबाहेर तडजोड करण किती महाग पडू शकत, हेच या घटनेतून दिसून आलय. . प्रियंकाच (25) शिवम गुप्ता (26) बरोबर लग्न झालं. त्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात ती प्रियकर गरजन यादव (23) सोबत पळून गेली.

Extramarital affair | विचित्र प्रेम! बायकोवरच्या प्रेमासाठी तिच्या बॉयफ्रेंडला सोबत घरी ठेवलं, अखेर नको तेच घडलं
Extramarital affair accused arrested
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 12:01 PM

गाझियाबाद : नवरा-बायकोच नात पवित्र मानल जातं. पण काहीवेळा विवाहबाह्य संबंधांमुळे या पवित्र नात्याला कलंक लागतो. पती किंवा पत्नी यापैकी एकाने विश्वासघात केला, तर संसाराची वीण उसवायला वेळ लागत नाही. त्यात अख्ख कुटुंब कोलमडून पडत. अशीच एक विचित्र घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजल्यानंतर मर्यादेबाहेर तडजोड करण किती महाग पडू शकत, हेच या घटनेतून दिसून आलय. या सगळ्याच शेवट खूप दुर्देवी झाला. प्रियंकाच (25) शिवम गुप्ता (26) बरोबर लग्न झालं. त्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात ती प्रियकर गरजन यादव (23) सोबत पळून गेली. उत्तर प्रदेश बलियामध्ये ती प्रियकर गरजन यादवसोबत राहत होती. ती आपल्यासोबत 2 वर्षाच्या मुलीला घेऊन गेली होती.

गरजन दैनंदिन मजुरीवर काम करणारा कामगार आहे. तो प्रियंका आणि शिवमसोबत बहरामपूर गावामध्ये रहायचा. शिवम शहरात बाईक टॅक्सी चालवण्याचे काम करतो. प्रियंका गरजनसोबत पळून गेल्यानंतर महिन्याभराने शिवमचा तिच्याशी संपर्क झाला. ती गरजनसोबत बलियामध्ये रहायची. शिवम तिथे गेला व घरी सोबत येण्यासाठी प्रियंकाला विनवणी करुन लागला. त्यावेळी तिने एक अट ठेवली. गरजनसोबत राहणार असेल, तरच घरी परत येईन असं तिने सांगितलं. बायको आणि मुलीवरच्या प्रेमासाठी शिवम तयार झाला.

तिच्या विवाहबाह्य संबंधांवरुन भांडण

शिवम, प्रियंका आणि गरजन तिघे एका भाड्याच्या घरात राहू लागले. पण लवकरच अशा प्रकारच्या तडजोडीमधून काय होऊ शकत, ते दिसू लागलं. शिवम आणि प्रियंकामध्ये तिच्या विवाहबाह्य संबंधांवरुन भांडण होऊ लागली. 21 डिसेंबरला शिवम झोपलेला असताना प्रियंकाने आपल्या हाताने त्याचा गळा आवळला. गरजनने चाकूने त्याच्यावर अनके वार केले, असं पोलिसांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

सत्य काय ते सांगून टाकलं

हत्या केल्यानंतर प्रियंका आणि गरजनने शिवमचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला व निर्जन स्थळी फेकून दिला. घरातील रक्ताचे डाग त्यांनी धुवून साफ केले. 22 डिसेंबरला एका वाटसुरुला शिवमचा मृतेदह दिसला. पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा, प्रियंकाने शिवम नाईट शिफ्टसाठी गेला होता असं सांगितलं. गरजन नातेवाईक असून सोबत राहतो असं तिने सांगितलं. तपासात पोलिसांनी तिघे राहत असलेल्या इमारतीच्या पाऱ्यावर रक्ताचे डाग आढळले. पोलिसांना संशय आला. त्यांनी आपला खाक्या दाखवताच प्रियंकाने सत्य काय ते सांगून टाकलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.