आधी कोल्ड्रिंकमधून विष दिलं, नंतर गळा दाबून… स्वत:च्याच पतीचे ‘तिने’ असे हाल का केले ?
या महिलेने प्रथ्म तिच्या पतीला कोल्ड्रिंकमधून विष दिले. मात्र ती एवढ्यावरच थांबली नाही तर नंतर तिने पतीचा गळाही दाबला आणि त्याचं आयुष्य संपवलं.

वाराणसी : पती-पत्नीचे पवित्र नातं हे विश्वासावर आधारित असते. मात्र एक अशी घटना घडली आहे, जिथे एका पत्नीने तिच्याच पतीचा विश्वासघात केल्याचे समोर आले आहे. अवैध संबंधामुळे तिने पतीची (wife killed husband) हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिच्या मेव्हण्याशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र महिलेच्या पतीला ही बाब कळताच त्याने त्या दोघांना विरोध करण्यास सुरूवात केली.
त्यामुळे संतापलेल्या महिलेने तिचा पती अनिल याच्या कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळलं व त्याला प्यायला दिलं. तो बेशुद्ध झाल्यावर प्रियकरासोबत मिळून पतीचा गळा दाबून त्याची अमानुषपणे हत्या केली. ही घटना वाराणसी येथे घडली असून यामुळे एकच खळबळ माजली आहे. आरोपी महिलेचे व तिच्या मेव्हण्याचे एकमेकांवर प्रेम होते. गेल्या काही काळापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्या महिलेच्या पतीला याची कुणकुण लागल्यावर महिलेने प्रियकरासह त्याची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लंका ठाणे क्षेत्रातील श्रीगोवर्धपूर येथे राहणारा अनिल (वय 33) हा 16 जूनपासून घरातून अचानक बेपत्ता झाला होता. कुटुबियांनी त्याचा बराच शोध घतला, मात्र त्याचा काहीच शोध लागला नाही. अखेर 19 जून रोजी त्यांनी अनिल हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. तपास सुरू केल्यावर पोलिसांनी अनिलच्या मोबाईलमधून मिळालेल्या कॉल डिटेल्सची तपासणी केली असता त्यांना अनिलची पत्नी व भदोही येथील मेह्वण्यावर संशय आलाय प्रेमप्रकरणामुळे होत्याचं नव्हतं झालं
त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांचे कॉल डिटेल्स काढले असता, ते दोघेही एकमेकांशी फोनवर तासन् तास बोलायचे हे समोर आले. तेव्हा पोलिसांनी अनिलची पत्नी व तिच्या मेव्हण्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. अवैध प्रेमसंबंधांमुळे ही हत्या झाल्याचेही पोलिस तपासात उघड झालेय
दोघांनाही केली अटक
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर हिसका दाखवताच अनिताने तिचा गुन्हा कबूल केला. तिने प्रथम अनिलला कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून ते प्यायला दिले. नंतर तो बेशुद्ध झाल्यावर अनिता व तिच्या प्रियकराने त्याचा गगळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते कारमधून निघाले. आणि वाराणसीला लागून असलेल्या चंदौली जिल्ह्यातील अलीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ हायवेच्या कडेला त्यांनी मृतदेह फेकून दिला.
आपले मेव्हण्याशी प्रेमसंबंध होते, मात्र पतीचा त्याला विरोध होता व तो आमच्या मार्गातील अडथळा ठरत होता. म्हणून प्रियकरासह मिळून आपण पतीची हत्या केल्याचे तिने कबूल केले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.