शेजारी नवरा झोपलेला, बायकोने झोपेत ‘ते’ नाव घेतलं, आणि मग…..
सहा महिन्यापूर्वी झालेलं लग्न धोक्यात आलं आहे. याच कारण आहे, पत्नीने रात्री झोपेत केलेली एक चूक. रविवार रात्रीची गोष्ट आहे. 12 च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला.
लखनऊ : दोघांच्या लग्नाला सहा महिनेच झाले आहेत. पण या दरम्यान अशी एक घटना घडली की, त्यांचं लग्न धोक्यात आलं आहे. कुठलेही पुरावे नाहीयत, पण पत्नीची एक चूक तिला चांगलीच महाग पडली. रविवारी रात्रीची घटना आहे. पत्नी-पत्नी शेजारी झोपले होते. रात्री झोपेतच पत्नी भावोजीच नाव घेऊ लागली. तिच्या आवाजामुळे नवऱ्याचे डोळे उघडले. त्याने पाहिलं, पत्नी सारख भावोजीच नाव घेतेय. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. पत्नीच्या तोंडून वारंवार भावोजीच नाव ऐकून तो खवळला. त्याने पत्नीला झोपेतून उठवलं.
घरामध्ये मोठ भांडण झालं. त्याने पत्नीवर गंभीर आरोप करत तिला मारहाण केली. पत्नीच म्हणणं असं होतं की, तिने एक भीतीदायक स्वप्न पाहिलं, म्हणून ती तिच्या भावोजीच नाव घेत होती. वाद वाढल्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांनी दोघांची समजूत काढून त्यांना घरी पाठवलं.
पत्नीच काय म्हणण?
दोघांच्या लग्नाला सहा महिनेच झाले आहेत. नवऱ्याचा आरोप आहे की, पत्नी नेहमी झोपताना तिच्या भावोजीच नाव घेते. रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. पत्नी वारंवार तिच्या भावोजीच्या नावाचा पुकार करु लागली. अजीमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. नवऱ्याने पत्नीवर हात उचलला. या गोंधळामुळे आसपासचे शेजारी तिथे जमले. नवरा भावोजीला बराच उलट-सुलट बोलला. पत्नीवर गंभीर आरोप केले. पत्नीच म्हणण होतं की, मला भीतीदायक स्वप्न पडतात. त्यामुळे मी भावोजीच नाव घेतलं असेल.