Facebook Viral Video: पत्नीचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला, पतीवर गुन्हा दाखल!

अनेक किस्से ऐकू आलेत आपल्याला ज्यात लोकांनी फेमस होण्यासाठी बरेच कारनामे केलेत. आता हाच किस्सा घ्या. या माणसाने फेसबुकचे फॉलोअर्स वाढविण्यासाठी हद्द पार केलीये.

Facebook Viral Video: पत्नीचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला, पतीवर गुन्हा दाखल!
Facebook Video Viral CrimeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 8:29 AM

सोशल मीडियावर (Social Media) फेमस होण्यासाठी लोकं काहीही करू शकतात. फॉलोवर्स वाढवणं जणू काही मोठा टास्क झालाय आजकाल. कधी कधी तर असंही वाटू लागतं की लोकं फक्त सोशल मीडियासाठी जगतायत. अनेक किस्से ऐकू आलेत आपल्याला ज्यात लोकांनी फेमस होण्यासाठी बरेच कारनामे केलेत. आता हाच किस्सा घ्या. या माणसाने फेसबुकचे फॉलोअर्स वाढविण्यासाठी हद्द पार केलीये. याने आपल्याच बायकोचा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर (Facebook Page Viral Video) केलाय. आता तुम्हाला वाटेल व्हिडीओ तर आहे त्यात काय एवढं? तो साधासुधा व्हिडीओ नव्हता. त्याने शेअर केलेला व्हिडीओ हा त्याच्या बायकोचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ (Wife’s video shared on Facebook) होता. हा व्हिडीओ शेअर होताच प्रचंड गदारोळ झाला. पत्नीने आपल्या पती विरोधात पोलीसांत तक्रार केली.

नेमकं काय घडलं?

ज्याने फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला तो इसम संदीप हा दिल्लीच्या उत्तम नगरमधील झोपडपट्टीत राहतो आणि तिथल्या सर्कसमध्ये काम करतो.

काही दिवसांपूर्वी संदीपची बायको माहेरी, कासगंजला होती. संदीप तिच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलत होता. व्हिडीओ कॉल चालू असतानाच संदीपची पत्नी अंघोळीला जाते.

आपला फोन ती  बाथरूममध्ये ठेवते आणि आपल्या पतीशी बोलू लागते. याच दरम्यान संदीप आपल्या पत्नीचा हा व्हिडिओ बनवून फेसबुकवर शेअर करतो.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जसा हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर झाला तसा तो व्हायरल झाला. संदीपच्या पत्नीला नातेवाईकांचे फोन येऊ लागले. हा व्हिडिओ त्याच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांनी पाहिला होता.

या व्हिडिओवर अनेक अश्लील कमेंट्सही येऊ लागल्या. तेव्हा संदीपच्या पत्नीने फेसबुक अकाउंट पाहिले. तिला फेसबुकवर आंघोळ करतानाचा व्हिडिओ सापडला.

तिने पतीला फेसबुकवरून व्हिडिओ हटविण्यास सांगितले मात्र पतीने (संदीपने) तसे केले नाही. संदीपच्या पत्नीने पतीविरोधात पोलीस स्टेशन जसराना मध्ये गुन्हा दाखल केला तेव्हा संदीपने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ डिलीट केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.