पतीकडून अनैसर्गिक सेक्स, सासऱ्याकडून बलात्कार, पीडित महिलेचे गंभीर आरोप

मुलीशी आई-वडिलांचं एक वेगळं नातं असतं. मुलगी सुखात राहावी यासाठी चांगल्या कुटुंबात मुलीचं लग्न लावलं जातं. मात्र, राजस्थानात भयानक प्रकार समोर आला आहे (woman accuses husband for unnatural sex and father in law for rape)

पतीकडून अनैसर्गिक सेक्स, सासऱ्याकडून बलात्कार, पीडित महिलेचे गंभीर आरोप
हा धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे.
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 4:06 PM

जयपूर : मुलीशी आई-वडिलांचं एक वेगळं नातं असतं. मुलगी सुखात राहावी यासाठी चांगल्या कुटुंबात मुलीचं लग्न लावलं जातं. अनेक आई-वडील मुलीच्या सुखासाठी तिच्या सासरच्यांना हुंडा म्हणून काही रोख रक्कम देतात. याशिवाय बुलेट किंवा चार चाकी कारही देतात. मात्र, इतकं सगळं देऊनही काही विकृत सासरची मंडळी मुलीला छळतात. मुलीने तिच्या माहेरुन आणखी पैसे आणावे यासाठी त्रास देतात. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार घडला आहे. संबंधित पीडित महिलेने आपल्या पतीवर आणि सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत (woman accuses husband for unnatural sex and father in law for rape).

नेमकं प्रकरण काय?

पीडित महिलेचं 4 नोव्हेंबर 2019 रोजी मुस्लीम रितीरिवाजात लग्न करण्यात आलं होतं. पीडित महिलेच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्यांना लग्नाच्यावेळी 1 लाख 51 हजार रुपये रोख रक्क हुंडा म्हणून दिला. त्याचबरोबर एक बुलेट गाडीदेखील दिली. मात्र, लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनंतर महिलेच्या सासरच्यांनी पाच लाख रुपयांचा आणखी हुंडा मागितला. मुलीने आपल्या आईला याबाबत सांगितलं. पण एवढी मोठी रक्कम आपण देऊ शकत नाही, असं पीडितेच्या आईने स्पष्ट केलं. त्यानंतर पीडितेच्या सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.

कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पीडित महिलेने पतीवर अनैसर्गिक सेक्स आणि सासऱ्यावर बलात्कारचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे पीडित महिला याबाबत तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेली असता पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे महिलेला कोर्टात जावं लागलं. त्यानंतर कोर्टाने दिलेल्या निर्देशांनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेचे पतीवर गंभीर आरोप

धौलपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत संबंधित घटना घडली आहे. संबंधित महिलेचा पती तिला नैसर्गिक सेक्ससाठी मजबूर करायचा. यासाठी तो तिला कुऱ्हाडीने हत्या करण्याचीदेखील धमकी द्यायचा, अशी तक्रार महिलेने केली आहे. तसेच महिला गरोदर असताना पतीने जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या, असा गंभीर आरोपही तिने केला आहे.

पीडितेचे सासरच्यांवरही गंभीर आरोप

पीडित महिलेने आपल्या सासऱ्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सासऱ्याने जीवे मारण्याची धमकी देवून बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. त्याचबरोबर तिच्या सासरच्यांनी तिला शारीरिक, मानसिकरित्या छळल्याचा आरोप तिने केला आहे. सासरचे आपल्याला माहेरहून पाच लाख रुपये हुंडा मागण्यासाठी भाग पाडत आहेत, असंही तिने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी कलम 377, 376, 498 ए, 406,323, 341, 313, 504, 143 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडितेची मेडिकल चाचणीदेखील केली आहे (woman accuses husband for unnatural sex and father in law for rape).

हेही वाचा : 10 वी नापास भामट्याचा पोलिसाला दीड कोटीचा चुना, वकील आणि इतर पोलिसांचीही फसवणूक

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.