Viral Video : चोर तो चोर वर शिरजोर..! कायदा हातात घेत महिलेची Bus Driverला बेदम मारहाण

Woman beat bus driver : एक व्हायरल व्हिडिओ चर्चेत असून, एक महिला (Women) बस चालकाला मारहाण (Beating) करताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Video) एका स्थानिक पत्रकाराने त्याच्या ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. ड्रायव्हरची कॉलर धरून ती त्याच्यावर धमकावतेय.

Viral Video : चोर तो चोर वर शिरजोर..! कायदा हातात घेत महिलेची Bus Driverला बेदम मारहाण
विजयवाडा - बस चालकाला मारहाण करताना महिला
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 11:18 AM

Woman beat bus driver : सोशल मीडियाच्या विश्वात रोज काही ना काही व्हिडिओ चर्चेत राहतात. सध्या असाच एक व्हायरल व्हिडिओ चर्चेत असून, त्यावरून जोरदार खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला बस चालकाला मारहाण (Beating) करताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Video) एका स्थानिक पत्रकाराने त्याच्या ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. ज्यामध्ये एका महिलेने (Women) बसच्या ड्रायव्हर सीटवर बसलेल्या पुरुषाला रागाने मारले. या मुद्द्यावर आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आणि कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहे. जिथे एक महिला चुकीच्या बाजूने जात असताना सरकारी बसने तिच्या स्कूटीला धडक दिली. त्यानंतर महिला बस चालकाला मारहाण करताना दिसत आहे. ड्रायव्हरची कॉलर धरून ती त्याच्यावर धमकावताना दिसत आहे.

ट्विटरवर शेअर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की महिलेला ड्रायव्हरला ओढून बाहेर काढायचे होते, पण ड्रायव्हर स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. दरम्यान, महिलेने बसमध्येच चालकाला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला असून त्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे, की महिलेने ड्रायव्हरला मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे, हे निंदनीय आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘कडक कारवाई झाली पाहिजे’

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, की आजकाल महिला या महिला आणि मुलगी असल्याचा गैरफायदा घेत आहेत, जसे लखनऊची मुलगी, बेंगळुरूची मुलगी आणि आता ही…! पुरुष सर्वत्र चुकीचे नसतात. त्याचवेळी आणखी एका यूझरने लिहिले, की या महिलेवर कडक कारवाई झाली पाहिजे. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा :

Indurikar maharaj kirtan : …नाहीतर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, इंदोरीकर महाराजांनी सांगितला सुखी जीवनाचा कानमंत्र, Video viral

केवळ 60 सेकंदांत फोडले 122 नारळ! या Superpower manला पाहिलं का? Video तुफानViral

Makeup artistनं लता मंगेशकरांना वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली; यूझर्स म्हणतायत, विश्वासच नाही बसत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.