अनैतिक प्रेमासाठी पतीचा अमानुष छळ, पतीसोबत महिलेने केले असे काही वाचून हैराण व्हाल

लग्नानंतर काही दिवसांनी मुलीचे दुसऱ्या समाजातील तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. वारंवार समजावूनही तरुणी हे प्रेमसंबंध तोडण्यास तयार नव्हती. अखेर तरुणाने 19 जून 2020 रोजी पोलीस अधीक्षक, बागपत यांच्याकडे तक्रार केली.

अनैतिक प्रेमासाठी पतीचा अमानुष छळ, पतीसोबत महिलेने केले असे काही वाचून हैराण व्हाल
पंजाबमध्ये शाळा उडवण्याची धमकी
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 11:47 PM

उत्तर प्रदेश : प्रेमासाठी वाट्टेल ते असे म्हटले जाते. मात्र उत्तर प्रदेशात महिलेने अनैतिक प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत स्वतःच्या पतीसोबत भयानक कृत्य केल्याचे उघड झाले आहे. महिलेने जे केले ते ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. प्रियकरासोबत मिळून महिलेने अनेक दिवस पती (Husband)ला बंदी बनवून त्याचा अमानुष छळ (Torture) केला. पीडित तरुणाच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्याची सुटका (Rescued) केली. पोलीस तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेने आधी प्रियकराच्या मदतीने पतीला ओलीस ठेवले आणि नंतर त्याचा अतोनात छळ केला. पतीला नामर्द बनवण्यासाठी महिलेने दातांनी गुप्तांगाला चावा घेतला.

तरुणांनी आवाहन केले होते, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही

पीडित तरुणाच्या नातेवाईकांनी कोतवाली गाठून आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडित तरुण हा गुराणा रोड येथील रहिवासी आहे. त्याचा विवाह चार वर्षांपूर्वी शाल्मली भागातील एका गावात राहणाऱ्या झीनत या मुलीशी झाला होता.

हे सुद्धा वाचा

लग्नानंतर काही दिवसांनी मुलीचे दुसऱ्या समाजातील तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. वारंवार समजावूनही तरुणी हे प्रेमसंबंध तोडण्यास तयार नव्हती. अखेर तरुणाने 19 जून 2020 रोजी पोलीस अधीक्षक, बागपत यांच्याकडे तक्रार केली. यावेळी जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची विनंती केली, परंतु पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही.

पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले

एका आठवड्यापूर्वी पीडित तरुणाने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. यानंतर त्याने याला विरोध केला असता महिलेने प्रियकराच्या मदतीने त्याला ओलीस ठेवले. त्यानंतर अनेक दिवस त्याच्यावर अत्याचार केला.

हा खळबळजनक प्रकार तरुणाच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी पोलिसांसह घटनास्थळ गाठून तरुणाची पत्नीच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनीही कोतवाली पोलीस ठाण्यात कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने केली. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.