Chandrapur Crime : दारावर कुणीतरी आलं म्हणून दरवाजा उघडायला गेली, दार उघडताच महिला जमिनीवर कोसळली, गोळीबाराच्या घटनेने चंद्रपूर पुन्हा हादरले !

दरवाजा ठोठावला म्हणून घरातील महिलेने दार उघडले. पण दार उघडताच काही कळायच्या आत महिला जमिनीवर कोसळली.

Chandrapur Crime : दारावर कुणीतरी आलं म्हणून दरवाजा उघडायला गेली, दार उघडताच महिला जमिनीवर कोसळली, गोळीबाराच्या घटनेने चंद्रपूर पुन्हा हादरले !
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 9:48 AM

चंद्रपूर / 24 जुलै 2023 : जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात काल रात्री घडली आहे. अज्ञाताकडून झालेल्या गोळीबारात एका निष्पाप महिलेचा नाहक बळी गेला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. पूर्वशा सचिन डोहे असे मयत महिलेचे नाव असून, त्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी आहेत. तर लल्ली शेरगिल असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर शहरातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसा माफियाकडून एका अज्ञात व्यक्तीवर हा हल्ला करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने पूर्वशा डोहे या समोर आल्या आणि नाहक बळी गेल्या. या घटनेमुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, एक अल्पवयीन आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

चंद्रपूरमधील राजुरा शहरात अवैध कोळसा उत्खनन मोठ्या प्रमाणावर चालते. यामुळे येथे कोळसा माफियांचा सुळसुळाट आहे. याच कोळसा माफियागिरीतून लल्ली शेरगिल याच्यावर हल्ला करण्यात येत होता. यावेळी लल्ली हा जीव वाचवण्यासाठी शहरातील सोमनाथपूर वार्डातील भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी आश्रयासाठी घुसला. यावेळी आरोपीही त्याचा पाठलाग करत डोहे यांच्या घराजवळ आले.

यावेळी गोळीबारत पूर्वशा यांचा हकनाक बळी गेली. दरवाजा ठोठावला म्हणून डोहे यांची पत्नी पूर्वशा या दरवाजा उघडण्यास आल्या. दरवाजा उघडताच पूर्वशा यांच्यावर दोन गोळ्या आरोपीने झाडल्या. यात पूर्वशा यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य लल्ली नामक व्यक्ती जखमी झाला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना दोघांना ताब्यात घेतले

जखमीला उपचारासाठी चंद्रपूरला हलवले आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी रात्रीच वेगवान हालचाली करत एका आरोपीसह एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. लबज्योत देवल असे अटक आरोपीचे नाव आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.