Pune : तीक्ष्ण हत्याराने वार करून पुण्यात महिलेची हत्या, कारण अस्पष्ट

सकाळी मयत पूजा देवी प्रसाद या दुकानात असताना त्यांच्यावरती अज्ञात इसमाकडून हत्या करण्यात आली. हत्या इतकी भयानक होती की भोसरीचा संपुर्ण परिसर घटनेनं हादरुन गेला.

Pune : तीक्ष्ण हत्याराने वार करून पुण्यात महिलेची हत्या, कारण अस्पष्ट
Pune : तीक्ष्ण हत्याराने वार करून पुण्यात महिलेची हत्या, कारण अस्पष्ट Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 4:16 PM

पुणे : मागच्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune) गुन्हेगारीचं प्रमाण अधिक वाढलं आहे. तसेच क्षुल्लक कारणामुळे हत्या झाल्याचं अनेक प्रकरणात उघडकीस आलं आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) अशी एक घटना घडली आहे, त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. महिलेच्या गळ्यावर वार करण्यात आल्याची माहिती समजली आहे. ही घटना भोसरी परिसरात घडली असून काहीवेळात नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली. नागरिकांची तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्याचबरोबर पोलिसांचं (Pune Police) पथक तिथं दाखल झालं आहे. तसेच पोलिस या घटनेची सखोल माहिती घेत आहेत. कारण महिलेचा आरोपीने गळा चिरला आहे. मयत महिलेचं एक दुकान आहे. पोलिस सीसीटीव्हीचा आधार घेऊन आरोपीचा शोध घेत आहेत. मृतदेहाचा पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह सरकारी रुग्णालयात दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं

सकाळी मयत पूजा देवी प्रसाद या दुकानात असताना त्यांच्यावरती अज्ञात इसमाकडून हत्या करण्यात आली. हत्या इतकी भयानक होती की भोसरीचा संपुर्ण परिसर घटनेनं हादरुन गेला. पूजा देवी प्रसाद यांचं भोसरी परिसरात एक दुकान आहे. प्रगती कलेक्शन असं त्याचं नाव आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हत्या कोणत्या कारणामुळे केली याचा अद्याप उलघडा झालेला नाही. पोलिसांनी एक पथक तयार केलं असून आरोपीचा शोध विविध माध्यमातून घेत आहेत. हत्या झालेल्या ठिकाणी पोलिसांना काही संशयित गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचा तपास सोप्पा होणार असं दिसतंय.

आरोपीला लवकरचं बेड्या ठोकतील

मागच्या काही वर्षात राज्यात अशा विविध घटना घडल्या आहे. त्याच काहीवेळा क्षुल्लक कारण असल्याचं उजेडात आलं आहे. तर काहीवेळेला जवळच्या व्यक्तीकडून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. मोबाईल किंवा अन्य साधनांच्या माध्यमातून पोलिस घटनेचा शोध घेत आहेत. लवकरचं आरोपीला पोलिस बेड्या ठोकतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.