पंजाब : महिलांच्या सन्मानाबाबत आपण अधिक जागृत आहोत. महिलांच्या सन्मानाशी आपण तडजोड करत नाही. महिलांच्या सन्मानाबात आम आदमी पक्ष नेहमीच डंका मिरवत असतो. मात्र याच आम आदमी पक्षा (Aam Adami Party)च्या पंजाबमधील महिला आमदारा (Women MLA)चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हिडिओमध्ये सदर महिला आमदाराचा पती तिला थोबाडात मारताना दिसत आहे. पंजाब महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. याप्रकरणाची दखल घेऊन दोषी व्यक्तीवर कारवाई करु, असे आश्वासन पंजाब महिला आयोगाने दिले आहे.
आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार बलजिंदर कौर यांना त्यांच्या पतीने थोबाडात मारल्याचा आरोप आहे, जो स्वतः सत्ताधारी पक्षाचा नेता देखील आहे. या घटनेचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तलवंडी साबोच्या दोन वेळा आमदार राहिलेल्या कौर यांना जोरदार वादावादीनंतर त्यांचा पती मारहाण करत आहे.
व्हिडिओमध्ये बलजिंदर कौर पती सुखराज सिंहसोबत वाद घालताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सिंह अचानक उठून रागाच्या भरात कौरला चापट मारताना दिसत आहे. त्यानंतर जोडप्याजवळ उभे असलेले काही लोक हस्तक्षेप करतात आणि कौर यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात. ही घटना 10 जुलै रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारपासून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. पंजाबच्या आमदाराने याबाबत आपल्या पतीविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी सांगितले की, त्यांनी व्हिडिओ पाहिला आहे आणि या घटनेची स्वतःहून दखल घेतील.
माझा क्षेत्रासाठी AAP च्या युवा शाखेचे संयोजक कौर आणि सिंह यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये विवाहबद्ध झाले. बलजिंदर कौर यांनी 2009 मध्ये पंजाब विद्यापीठ, पटियाला येथून एम फिल केले. राजकारणात येण्यापूर्वी कौर माता गुजरी कॉलेज, फतेहगढ साहिब येथे इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. (Woman MLA beaten by husband in front of activists in Punjab)