निवृत्त मुख्याध्यापकाकडून सरकारी कार्यालयात महिलेवर अतिप्रसंग, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Nashik Crime News: नाशिक पंचायत समितीच्या कार्यालयात निवृत्त मुख्याध्यापकाने दिव्यांग कर्मचारी महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हा प्रकार घडला. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले.

निवृत्त मुख्याध्यापकाकडून सरकारी कार्यालयात महिलेवर अतिप्रसंग, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
नाशिक पंचायत समिती कार्यालयात लावलेला बंदोबस्त
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 5:37 PM

राज्यात बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या प्रकारामुळे आरोपीला फाशी देण्याची मागणी बदलापूरकरांनी केली होती. शाळेतील सफाई कामगाराने हा प्रकार केला होता. नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. सरकारी कार्यालयात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने कर्मचारी महिलेवर अतिप्रसंग केला. त्यानंतर आरोपीला सोडून दिल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले. कर्मचाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सेवापुस्तक शोधताना घडला प्रकार

नाशिकच्या पंचायत समितीच्या कार्यालयात 27 ऑगस्ट रोजी ही संतापजनक घटना घडली आहे. सकाळी 11 ते दुपारी 12 दरम्यान पीडित दिव्यांग महिला कर्मचारी ही नाशिक पंचायत समितीच्या कार्यालयात कर्तव्यावर होती. त्यावेळी कार्यालयातील एक निवृत्त मुख्याध्यापक त्यांच्या कामासाठी कार्यालयात आले. लिपिकाने सांगितल्यानंतर ती महिला कर्मचारी सेवापुस्तक कार्यालयातील कपाटात शोधत होत्या. त्यावेळी नाशिक पंचायत समितीच्या कार्यालयात निवृत्त मुख्याध्यापकाने दिव्यांग कर्मचारी महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हा प्रकार घडला.

कर्मचाऱ्यांचे आंदोलन, कार्यालयात पोलीस बंदोबस्त

कार्यालयातील कपाटांच्या आड दिव्यांग महिलेच्या हतबलतेचा फायदा घेत त्या निवृत्त मुख्यध्यापकाने विनयभंग केला. त्यानंतर त्या निवृत्त मुख्याध्यापकाला सोडून देण्यात आल्याने कर्मचारी संतप्त झाले. कर्मचारी आक्रमक झाल्याने पंचायत समितीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे. कर्मचाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडून कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात सर्व महिलाराज असताना महिलेला न्याय मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, संशयित आरोपी फरार असून सरकारवाडा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस म्हणतात, योग्य वेळी आरोपीला ताब्यात घेऊ…

सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितले की, काही कागदपत्रे महिला शोधत असताना त्या मुख्याध्यापकाने विनयभंग होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु असून आरोपीला योग्य वेळी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.