Rape on Women | धक्कादायक, आठवडाभर महिलेवर बलात्कार, अंगावर फेकली गरम डाळ

Rape on Women | महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. पण अजूनही महिलांसोबत बलात्कार आणि अन्य गंभीर गुन्हे घडतच आहेत. आता एका महिलेवर आठवडाभर बलात्कार करण्यात आला व तिच्या अंगावर गरम डाळ फेकण्याच भयानक प्रकरण समोर आलय.

Rape on Women | धक्कादायक, आठवडाभर महिलेवर बलात्कार, अंगावर फेकली गरम डाळ
crime
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 1:11 PM

Rape on Women | तिने मित्र म्हणून विश्वास ठेवला. पण त्याने दगा दिला. आठवडाभर एक महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पारस (28) असं आरोपीच नाव आहे. बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केला, सोबत त्याने तरुणीला खूप त्रास दिला. बलात्कार आणि शारीरिक छळ या आरोपांखाली पारसला 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. 30 जानेवारीला ही घटना उजेडात आली. नेब सराई पोलीस स्टेशनला एक पीसीआर कॉल आला. त्यामध्ये महिलेला तिचा नवरा मारहाण करत असल्याची माहिती देण्यात आली.

कॉल येताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची सुटका केली व तिला एम्स रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात तिला आणलं, त्यावेळी तिच्या शरीरावर 20 जखमा होत्या. पारसशी ओळख झाल्यानंतर पीडित महिला तीन-चार महिन्यापासून त्याच्या संपर्कात होती. तिला घरकामाची एक नोकरी मिळाली होती. त्यासाठी तिने बंगळुरुला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पोहोचण अपेक्षित होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

लैंगिक शोषण केलं

पारसने आठवडाभर तिला माराहण केली. तिचं लैंगिक शोषण केलं. शारीरिक छळ करताना त्याने तिच्या अंगावर गरम डाळही एकदा फेकली होती. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन 30 जानेवारीला आरोपीविरोधात FIR नोंदवण्यात आला. कलम 323, 376 (बलात्कार) आणि कलम 377 लावण्यात आलं आहे. आरोपी पारस उत्तराखंडचा रहिवाशी आहे. दिल्लीतील एक उपहारगृहात तो आचारी म्हणून नोकरी करतो. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.