AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मळणी करताना यंत्रात स्कार्फ अडकल्याने अपघात, महिलेचे डोके शरीरापासून वेगळे…

या धक्कादायक घटनेमुळे केंजळ गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. सावित्रा ही आपल्या कुटुंबाची आर्थिक आधारस्तंभ होती. तिच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मळणी करताना यंत्रात स्कार्फ अडकल्याने अपघात,  महिलेचे डोके शरीरापासून वेगळे...
Follow us
| Updated on: Apr 28, 2025 | 4:18 PM

पुण्याच्या भोर तालुक्यातील केंजल गावात मळणी करताना स्कार्फ यंत्रात अडकल्याने २४ वर्षीय महिलेचे डोके धडापासून वेगळे झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. सावित्रा पांडुरंग गायकवाड असं मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रा गायकवाड गेल्या पाच वर्षांपासून आपल्या कुटुंबासह केंजळ येथील मयूर चव्हाण यांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करत होत्या. शनिवारी सायंकाळी सावित्रा आणि तिचे पती पांडुरंग गायकवाड यांनी गावातील नितीन बाठे यांचे मळणी यंत्र बोलावून शेतातील बाजरी भरडण्याचे काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मळणी यंत्राद्वारे बाजरी भरडताना सावित्रा मशिनमध्ये पडलेली बाजरीची कणसे उचलत होती. यावेळी त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि केस ट्रॅक्टर आणि मळणी यंत्राला जोडणाऱ्या फिरत्या रॉडमध्ये अडकले. यामुळे तिचे डोके फिरत्या रॉडमध्ये ओढले गेले आणि अक्षरशः शरीरापासून वेगळे झाले. या भयंकर घटनेत सावित्राचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, राजगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, मळणी यंत्राच्या सुरक्षिततेच्या निकषांचाही तपास केला जाणार आहे. स्थानिकांनी मळणी यंत्रासारखी यंत्रसामग्री वापरताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.