बॉयलरच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, जय महेश कारखान्यातील धक्कादायक घटना

पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास टोले हे बॉयलरजवळ दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी बॉयलरच्या पट्ट्यात अडकल्याने टोले यांचा जागीच मृत्यू झाला.

बॉयलरच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, जय महेश कारखान्यातील धक्कादायक घटना
बीडमध्ये बॉयलरच्या पट्ट्यात अडकून कामगाराचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 5:32 PM

बीड / महेंद्र मुधोळकर (प्रतिनिधी) : दुरुस्तीचे काम करत असताना बॉयलरच्या पट्टयात अडकून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. माजलगाव तालुक्यातील जय महेश कारखान्यामध्ये मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली. कल्याण गणपती टोले असे मयत 40 वर्षीय कामगाराचे नाव असून, तो आनंदगाव येथील रहिवाशी आहे. टोले हे तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात (शुगर इंडस्ट्री) कामगार म्हणून कामाला होते. या घटनेमुळे टोले यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुरुस्तीचे काम सुरु असताना घडली दुर्घटना

पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास टोले हे बॉयलरजवळ दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी बॉयलरच्या पट्ट्यात अडकल्याने टोले यांचा जागीच मृत्यू झाला. मयत टोले यांचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याबाबत अद्याप पोलीस कारवाईची प्रक्रिया चालू आहे. मयत कल्याण टोले यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी, आई वडील असा परिवार आहे. आनंदगावमध्ये आठ दिवसात तरुणाचा हा दुसरा अपघाती मृत्यू असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

भंडाऱ्यात मळणी यंत्रात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू

शेतातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी अडकल्याने महिलेचा गुरफटून मृत्यू झाल्याची दर्दैवी घटना भंडाऱ्यात घडली. लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे ही घटना घडली. शीतल धर्मशील कोचे असे मृत्यू झालेल्या 52 वर्षीय महिलेचे नाव आहे. शीतल यांच्या स्वतःच्या शेतातील उडीद पिकाची मळणी करण्यासाठी रुपचंद बगमारे यांची ट्रॅक्टरसह मळणी यंत्र सुरू होते. यावेळी शीतल मळणी यंत्र आणि ट्रॅक्टरच्या मधोमध उभी असताना त्यांची साडी लोखंडी सॉफ्टिंगला अडकून त्यात गुरफटल्याने शितल यांचा जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.