जिच्यासोबत सात जन्मांच्या सोबतीची शपथ घेतली तिनेच घात केला, प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं

हरियाणाचे प्रसिद्ध उद्योगपती योगेश बत्रा यांची त्यांच्या पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कोर्टाने या प्रकरणी योगेश यांच्या पत्नी प्रियंका बत्रा हिच्यासह तिचा प्रियकर आणि सुपारी घेतलेल्या दोघांना शिक्षा सुनावली आहे.

जिच्यासोबत सात जन्मांच्या सोबतीची शपथ घेतली तिनेच घात केला, प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 5:26 PM

चंदिगड : हरियाणाचे प्रसिद्ध उद्योगपती योगेश बत्रा यांची त्यांच्या पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कोर्टाने या प्रकरणी योगेश यांच्या पत्नी प्रियंका बत्रा हिच्यासह तिचा प्रियकर आणि सुपारी घेतलेल्या दोघांना शिक्षा सुनावली आहे. योगेश बत्रा यांची 2016 साली हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला बत्रा यांच्या पत्नीने हा एक सायलेंट अटॅक असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी तिच्यावर विश्वास ठेवला होता. पण बत्रा यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी प्रियंका बत्राची वागणूक बदलली. ती विचित्रपणे वागू लागली. त्यामुळे योगशे बत्रा यांचे वडील सुभाष बत्रा यांना आपल्या सूनेवर संशय आला. त्यांनी एका खासगी गुप्तहेराची मदत घेण्याचं ठरवलं. संबंधित खासगी गुप्तहेराने तपास केला असता प्रियंका हिनेच आपल्या पतीची हत्या केल्याचं उघड झालं. अखेर या प्रकरणी कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल सुनावला आहे.

कोर्टाचा नेमका निकाल काय?

यमुनानगरचे प्रसिद्ध उद्योगपत्री योगेश बत्रा हत्याकांड प्रकरणी यमुनानगर जिल्हा कोर्टाने बत्रा यांची पत्नी, तिचा प्रियकर रोहित आणि दोन कॉन्ट्रॅक्ट किलर सतीश व श्याम सुंदर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे कोर्टात जवळपास 4 वर्ष खटला चालला. या दरम्यान अनेक चढ-उतार आले. अखेर 25 साक्षीदारांच्या जबाबानंतर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने चारही आरोपींना हत्येचा दोषी मानत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोर्टाने प्रियंकासह इतर आरोपींना 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नेमकं प्रकरण काय?

यमुनानगरचे व्यापारी योगेश बत्रा यांचा 27 मे 2016 रोजी मृत्यू झाला होता. खरंतर त्यांच्या पत्नी प्रियंका हिनेच प्रियकराच्या मदतीने त्यांची हत्या केली होती. पण तिने आपल्या पतीचा सायलेंट अटॅकने मृत्यू झाला, असं कुटुंबियांना सांगितलं. घटनेनंतर काही दिवसांनी योगेश बत्रांचे वडील उद्योगपती सुभाष बत्रा यांना आपल्या सूनेवर संशय आला. कारण प्रियंकाची वागणूक त्यांना संशयास्पद वाटत होती. त्यांनी आपल्या स्तरावर एका खासगी गुप्तहेराद्वारे या प्रकरणाच्या तपास केला. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांकडून आधी आरोपींना क्लीन चिट

प्रियंका बत्रा हिचे जीम ट्रेनर रोहित कुमार सोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती गुप्तहेराच्या तपासात समोर आली. विशेष म्हणजे सुभाष यांना काही फोटो पुरावे म्हणून मिळाले. त्यातून त्यांना या गोष्टीवर विश्वास बसला. त्यांनी यमुनानगर पोलीस ठाण्यात जावून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पण पोलिसांनी आरोपींना क्लीन चिट दिली.

अखेर आरोपींविरोधात गुन्हा दाखल

अखेर सुभाष बत्रा यांनी हरियाणाचे पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एका एसआयटी टीमकडे सोपविण्यात आला. या एसआयटी टीमने या प्रकरणाचा खोलवर तपास केला. या टीमने काही टेक्निकल तथ्यांच्या आधारावर आरोपींविरोधात कलम 302, 506, 201, 120 बी, 203 सह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

संतापजनक ! डिलिव्हरी बॉयचं अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीसोबत विकृत कृत्य, मुंबई पुन्हा हादरली

बलात्कारात अपयशी ठरल्यानंतर बापाने मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली, सहा वर्षाची चिमुकली वेदनांनी विव्हळत राहिली

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.