पोलिसांनी रस्त्यावरची अंत्ययात्रा थांबवली, पुन्हा घराकडे फिरवली, महिलेचा जीवलग पतीच निघाला मारेकरी

यवतमाळमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची शुल्लक कारणावरुन हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने पतीची हत्या केल्यानंतर परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी आरोपीच्या कृत्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी रस्त्यावरची अंत्ययात्रा थांबवली, पुन्हा घराकडे फिरवली,  महिलेचा जीवलग पतीच निघाला मारेकरी
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 10:03 PM

विवेक गावंडे, Tv9 मराठी प्रतिनिधी, यवतमाळ | 18 फेब्रुवारी 2024 : यवतमाळ येथील जामनकरनगरातील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला. मात्र डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून पंचनामा केला. विवाहित महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली मिश्रा (वय 28) असं मृत महिलेचं तर महेश जनार्दन मिश्रा (वय 34) असं आरोपी पतीचं नाव आहे. याबाबत रत्नकला शंकर तिवारी (वय 72, रा. वारज, ता. दारव्हा) यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती.

घरगुती कारणातून आरोपी पतीने वाद घातला. या वादातून पतीने पत्नी दिपालीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने इतर नातेवाईकांच्या मदतीने परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला. दिपालीची अंत्ययात्रा जामनकरनगरातून स्मशानभूमीत जाण्यासाठी निघाली. याचवेळी डायल 112 वर संशयास्पद मृत्यूची तक्रार देण्यात आली. त्यानंतर अवधूतवाडी पोलीस जामनकरनगरच्या दिशेने रवाना झाले.

पोलिसांनी आरोपीला अटक कशी केली?

पोलिसांना बाजोरियानगरात अंत्ययात्रा दिसताच थांबवून घरी परत घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. तसेच संशयित पतीला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली. मात्र तो हृदयविकाराच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगत होता. रात्री उशीरा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दिपालीचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आलं. तसेच याबाबत तक्रारही दाखल झाली. त्यावरून पोलिसांनी पती महेश यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाता अधिक तपास अवधूतवाडी पोलीस करत आहेत.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.