लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, नंतर तेलंगाणामध्ये फरार, मोबाईल लोकेशन ट्रेस होताच बेड्या

रेल्वेमध्ये कामला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, नंतर तेलंगाणामध्ये फरार, मोबाईल लोकेशन ट्रेस होताच बेड्या
VASAI RAILWAY POLICE
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 3:56 PM

पालघर : रेल्वेमध्ये कामाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शेष प्रसाद उर्फ दिपू हिरालाल पांड्ये असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्येप्रदेश येथील रहिवाशी आहे.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार 26 जुलै 2021 रोजी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बलात्कार करुन आरोपी फरार झाला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

आरोपी होता फरार, तेलंगाणामधून अटक 

पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून आरोपीच्या मोबाईल फोनचे लोक्शन ट्रेस केले. त्याच्या लोकेशननुसार तो तेलंगाणा येथील हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सापळा रुचून आरोपी प्रसाद याला तेलंगाणा हैद्राबाद येतून अटक केली.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरु 

अटक करण्यात आलेला आरोपी हा रेल्वे विभागात कंत्राटी पद्धतीने बेसवरती स्टँड बॉय म्हणून कामाला होता. कामावर असतानाच त्याने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. दरम्यान वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात 323/भा.कलम 376, (2)(एन), 354,अ, (1) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याने याआधीदेखील असे कृत्य केल आहे का? याचा सखोल तपास वसई लोहमार्ग पोलीस करत आहेत.

नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची अशीच एक घटना 8 ऑक्टोबर रोजी समोर आली होती.  नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.  या गुन्ह्यात एकूण सात आरोपींचा समावेश होता. पोलिसांनी सातपैकी चार आरोपींना अटक केलं होतं. अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी अचानक तिथे पोहचलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. पण पोलीस तपास करत असताना मुलीच्या मित्रानेच पैसे घेऊन मुलांना बोलावले असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. या गँगरेप प्रकरणात एकूण सात आरोपी असून यात मुलीच्या मित्रासह चार जणांना अटक करण्यात आली होती.

इतर बातम्या :

सोलापुरात महिलेची हत्या करुन मृतदेह झुडपात फेकला, पोटच्या मुलावर संशय

औरंगाबादेत ड्रग्जच्या साठ्यावर छापा , विक्रीसाठी आणलेल्या अवैध सिरप व गोळ्यासह एकाला अटक

साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाला निघालेल्या साताऱ्याच्या महिला बाईक रायडरला अपघात, टँकर डोक्यावरुन गेल्याने मृत्यू

(young boy raped young girl by promisitng to marry her in palghar police arrested accused)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.