जुना मित्र वाटेत भेटला, मात्र तरुणीने बोलण्यास नकार दिला; मग संतापलेल्या तरुणाने थेट…
रस्त्याने चालत घरी जात असताना एका तरुणीला तिच्या जुन्या मित्राने वाटेत बोलण्यासाठी अडवले. मात्र तरुणीने बोलण्यास नकार दिल्याने तरुण चिडला आणि त्याने धक्कादायक पाऊल उचलले.
डोंबिवली / सुनील जाधव : बोलण्यास नकार दिला म्हणून तरुणीवर चाकू हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. आरोपी तरुण हा तरुणीचा जुना मित्र आहे. तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. सागर भालेकर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. भररस्त्यात तरुणीसोबत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रस्त्याने जात असताना जुन्या मित्राने बोलण्यासाठी अडवले
तरुणी डोंबिवली पूर्व भागातील सागर्ली रस्त्याने मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास जात होती. यावेळी तिचा जुना मित्र सागर भालेकर हा ररस्त्यात दिसला. मात्र तिने त्याच्याकडे लक्ष न देता ती चालत राहिली. यानंतर सागरने पुढे येऊ तिला अडवले आणि मला तुझ्याश बोलायचे आहे म्हटले. मात्र बोलण्यास नकार दिला आणि माझ्याशी बोलू नको मामाला नाव सांगने असे म्हटले.
तरुणी बोलण्यास तयार नसल्याने आरोपी चिडला
तरीही सागर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तरुणी बोलण्यास तयार नव्हती. यामुळे सागर चिडला आणि त्याने जवळील धारदार वस्तूने तरुणीच्या गळ्यावर वार करुन तिला गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेला. या प्रकरणी तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.