MP: लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला, मित्र म्हणाले नाटक करतोय; वाचा पुढे नेमकं काय घडलं?

मयत अंतलालचा नातेवाईक सोनू कुमरे याच्या लग्नाचे रिसेप्शन शनिवारी सुरु होते. सर्वत्र आनंदी वातावरण होते. वऱ्हाडी डिजेच्या तालावर धुंद झाले होते. अचानक नवरदेवाचा नातेवाईक असलेला एक तरुण जमिनीवर कोसळला. मित्रांना वाटले नृत्याचा भाग म्हणून जमिनीवर पडला.

MP: लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला, मित्र म्हणाले नाटक करतोय; वाचा पुढे नेमकं काय घडलं?
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 10:10 PM

मध्य प्रदेश : विवाह सोहळ्याला गालबोट लागल्याची घटना मध्य प्रदेशातील बैतुल येथे घडली आहे. नातेवाईकाच्या लग्नात(Wedding) नाचताना एका तरुणाचा अचानक मृत्यू(Death) झाल्याची घटना घडली आहे. अंतलाल उईके(32) असे मयत तरुणाचे नाव आहे. अंतलाल हा दोरी गावचा रहिवासी असून त्याचा नातेवाईक सोनू कुमरे याच्या लग्नात जामुन धाना गावात आला होता. शुक्रवारी लग्न होते आणि शनिवारी रिसेप्शन(Reception) होते. रिसेप्शन दरम्यान सर्व जण डीजेवर नाचत होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पीएम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. मयत अंतलाल हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. तसेच तो विवाहित असून त्याला 5 वर्षांची मुलगीही आहे. (Young man dies while dancing at friend’s wedding reception in Madhya Pradesh)

नाचता नाचता खाली कोसळला आणि मृत झाला

मयत अंतलालचा नातेवाईक सोनू कुमरे याच्या लग्नाचे रिसेप्शन शनिवारी सुरु होते. सर्वत्र आनंदी वातावरण होते. वऱ्हाडी डिजेच्या तालावर धुंद झाले होते. अचानक नवरदेवाचा नातेवाईक असलेला एक तरुण जमिनीवर कोसळला. मित्रांना वाटले नृत्याचा भाग म्हणून जमिनीवर पडला. तर काही लोकांना वाटले मुद्दाम नाटक करीत आहेत. तो डान्स करताना मजा करत असल्याचे घटनास्थळी उपस्थित लोकांना वाटले आणि लोक त्याचा मोबाईलवर व्हिडिओ बनवत राहिले. मात्र काही वेळ झाला तरी तरुण उठला नाही म्हणून लोक त्याच्याकडे धावले तर तो बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बैतुलच्या शाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जामुन धाना गावातील आहे.

भावी नवऱ्याने कानाखाली मारली, नवरीने दुसऱ्यासोबत लगीनगाठ बांधली

विवाह मंडपात नाचत होती म्हणून राग अनावर झालेल्या नवरदेवाने नवरीच्या कानशीलात लगावली. यानंतर नवरीनेही नवरदेवाला बाहेरचा रस्ता दाखवत दुसऱ्याशी लगीनगाठ बांधल्याची घटना चेन्नईत घडली. चेन्नईमध्ये 20 जानेवारी रोजी एका उद्योजकाच्या मुलीचा विवाह होता. विवाहासाठी लग्नमंडपात आल्यानंतर नवरी आपल्या नातेवाईकांसोबत नृत्य करीत होती. मात्र नवरीचे नृत्य करणे नवरदेवाला आवडले नाही. त्यामुळे त्यांच्याच वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला की नवरदेवाने नवरीच्या कानशीलातच लगावली. त्यानंतर नवरीने त्याला प्रतिउत्तर दिले. यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्न मोडत नवरदेवाला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करुन नात्यातल्याच चुलत भावाशी मुलीचा विवाह करण्यात आला. (Young man dies while dancing at friend’s wedding reception in Madhya Pradesh)

इतर बातम्या

Satara : साताऱ्यात अंनिसने उतरवलं अंधश्रद्धेचं भूत, जनजागृती करीत महिलेच्या डोक्यावरील जटा कापल्या!

Latur Crime : लातूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याला धारदार हत्याराने भोसकले, हत्येचे कारण अस्पष्ट

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.