Pune crime |’व्याजाची रक्कम का दिली नाही?, म्हणत तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून
आवारे याने प्रकाश शिंदे यांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या पैश्यांवरील व्याजाची रक्कम तो नियमितपणे भरतच होता. चालू महिन्यात शरद आवारे याला व्याज भरणे शक्य झाले नव्हेत. मात्र चालू महिन्याचे व्याज दिले नाही म्हणून त्याला प्रकाश शिंदेने भेटायला बोलावले होते.
पुणे – कर्जाऊ दिलेलया रक्कम परत देण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी धारदार शस्त्रांने तरुणावर वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. कात्रज -सिंहगड रोडवरील नवले पुलाच्या सर्व्हिस रोडवरही घटना घडली आहे. या घटनेत शरद शिवाजी आवारेचे ( वय- 43, धनकवडी ) याचा मृत्यू झाले आहे.
या प्रकरणी मृताचा मित्र प्रशांत कदम (वय 37 धनकवडी ) याने पोलिमिट तक्रार दिली आहे. याप्रकारणी पोलिसांनी आरोपी प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदाराच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
व्याजाचे पैसे देण्यावरून झाला वाद
याबाबत मिळालेले माहिती अशी की मृत शरद आवारे याने प्रकाश शिंदे यांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या पैश्यांवरील व्याजाची रक्कम तो नियमितपणे भरतच होता. चालू महिन्यात शरद आवारे याला व्याज भरणे शक्य झाले नव्हेत. मात्र चालू महिन्याचे व्याज दिले नाही म्हणून त्याला प्रकाश शिंदेने भेटायला बोलावले होते.
प्रकाशला भेटण्यासाठी शरद आला. त्याच वेळी प्रकाश व त्याच्यासोबत त्याचा एका साथीदार चंद्रलेखा वेअरहाऊस जवळ भेटले. तेथे त्यांच्या महिन्याचे व्याज का नाही दिले यावरुन वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले त्यानातूनच प्रकाश व त्याच्या साथीदाराने शरदवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शरदला तिथेच टाकून दोघांनी पाला काढला. घटनेनंतर जखमी अवस्थेत शरदाला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्य झाला. सिंहगड पोलीस अधिक तपास केला आहे.
सावधान! मेडिकल प्रवेशासाठी डोनेशन देताय? एक लाख घेताना भामटा अटकेत
सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात
सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात