मालमत्तेच्या वादातून तरुणाची गळा चिरून हत्या, बंद घरात बेडवर आढळला मृतदेह

पवन कुठे सापडत नव्हता म्हणून त्याचा शोध घेत त्याची बहिण घरी पोहचली. घरी पोहचताच बहिणीला आपला भाऊ मृतावस्थेत पडलेला आढळला. यानंतर तात्काळ याची माहिती रन्होळ पोलिसांना देण्यात आली.

मालमत्तेच्या वादातून तरुणाची गळा चिरून हत्या, बंद घरात बेडवर आढळला मृतदेह
मालमत्तेच्या वादातून तरुणाची गळा चिरून हत्या
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 4:18 PM

रन्होळा : स्वतःच्या भाड्याने दिलेल्या खोलीत एका 40 वर्षीय तरुणाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना रन्होळा परिसरात घडली आहे. पवन असे मयत तरुणाचे नाव आहे. पवनने भाड्याने दिलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत पवनचा मृतदेह आढळून आला. हत्येनंतर सर्व भाडेकरु फरार झाले आहेत. दरम्यान मालमत्तेच्या वादातून पवनची हत्या झाल्याचा आरोप पवनच्या बहिणीने केला आहे. तसेच हत्येबाबत काही लोकांवर आरोपही केला आहे. याप्रकरणी रन्होळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

भावाचा शोध बहिण घरी आली असता हत्येचा उलगडा

पवन कुठे सापडत नव्हता म्हणून त्याचा शोध घेत त्याची बहिण घरी पोहचली. घरी पोहचताच बहिणीला आपला भाऊ मृतावस्थेत पडलेला आढळला. यानंतर तात्काळ याची माहिती रन्होळ पोलिसांना देण्यात आली. पवनची बहिण ममता ही जी पीरागढी गावात राहते. शुक्रवारी रात्री उशिरा ममताने पोलिसांना फोन करुन भावाच्या हत्येची माहिती दिली. 26 नोव्हेंबर रोजी सकाळपासून ममता तिचा भाई पवनला फोन करीत होती. मात्र त्याचा फोन बंद येत होता. त्यामुळे भावाची खबरबात घेण्यासाठी ती त्याच्या घरी पोहोचली. मात्र घराचा दरवाजा बंद होता. त्यानंतर तिने पवनचे रन्होळा येथील घर गाठले. हे घर काही भाडेकरुंना भाड्याने देण्यात आले होते, अशी माहिती ममताने रन्होळा पोलिसांना दिली.

पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरु

पवनच्या रन्होळा येथील घरी येताच सर्व भाडेकरुंच्या खोल्या बंद असल्याचे ममताच्या निदर्शनास आले. ती पहिल्या मजल्यावर पोहचली. तिथली खोलीही बंदच होती. म्हणून खोलीच्या खिडकीतून आत पाहिले असता बेडवर कुणीतरी झोपले असल्याचे तिने पाहिले. यानंतर तिने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरवाजाचे कुलूप तोडले. कुलूप तोडून आत जाऊन पाहिले असता पवनचा मृतदेह पलंगावर पडलेला होता. याप्रकरणी ममताने काही लोकांची नावे पोलिसांसमोर घेत त्यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. पवनसोबत मालमत्तेवरुन आरोपींचा वाद झाला होता. पोलिसांनी हत्येता गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. (Young man strangled to death in property dispute, body found on bed in closed house)

इतर बातम्या

Aurangabad: मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडणारा आरोपी कोठडीत, यापूर्वीही एका बलात्कारात दोषी!

सोशल मीडियावरुन ओळख, तरुणीवर बलात्कार, अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.