अवघ्या तीन हजार रुपयांसाठी तरूणाने गमावला जीव, भररस्त्यात दिवसाढवळ्या झाला हल्ला..

राजधानीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले असून अवघ्या तीन हजार रुपयांसाठी एका तरूणावर भररस्त्यात वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अवघ्या तीन हजार रुपयांसाठी तरूणाने गमावला जीव, भररस्त्यात दिवसाढवळ्या झाला हल्ला..
संपत्तीसाठी स्वतःच्या आईला विष पाजले
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 9:42 AM

नवी दिल्ली | 3 ऑगस्ट 2023 : राजधानी दिल्लीमध्ये (crime in Delhi) गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या असून त्यामुळे शहरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. भरबाजारात दिसाढवळ्या एका तरूणावर चाकूने वार (attacked by knife) केल्याने त्याला जीव गमवावा (death) लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन हजार रुपयांसाठी हा हल्ला करण्यात आल्याच समजते.

पीडित तरूणावर आरोपीने 15-20 वेळा चाकूने सपासप वार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा हल्ला होत असना आजूबाजूच्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. कोणीच त्याला वाचवण्यासाठी पुढे आले नाहीत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

दिल्लीतील तिगडी भागात बुधवारी सकाळी हा हल्ला झाला. एक युवकावर चाकू हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तेथे 21 वर्षीय युसूफ हा युवक रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडला होता.त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.

मृत युवकाच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफने काही दिवसांपूर्वी शाहरूख नावाच्या व्यक्तीकडून 3 हजार रुपये उधार घेतले होते. शाहरूख त्याच्याकडे त्या रकमेची मागणी करत होता, तीन-चार दिवसांपूर्वी शाहरूखने त्याला धमकीही दिली होती. मात्र बुधवारी सकाळी शाहरूखने युसूफवर हल्ला केला, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. युसूफच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात हत्येचा गुव्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

घटनेचा व्हिडीओ आला समोर

दरम्यान काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या हल्ल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. एका दुकानाच्या बाहेर युसूफ रक्तबंबाळ अवस्थेत पडला आहे आणि आरोपी शाहरूख त्याच्यावर चाकूने वार करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आजूबाजूच्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थांबला नाही. जमिनीवर पडलेल्या युसूफने त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला.

पण संधी मिळताच इर लोकांनी धावत जाऊन शाहरूखला पकडले आणि त्याच्या हातातून चाकू सोडवून घेतला. त्यानंतर जमावाने त्यालाही बेदम मारहाण केली असून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.