नागपुरात तलवार, सुरीसारख्या घातक शस्त्रांचा साठा जप्त, दोघांना अटक
नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी घातक शस्त्रांसह दोन आरोपींना अटक केली आहे.
नागपूर : नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी घातक शस्त्रांसह दोन आरोपींना अटक केली आहे (Dangerous Weapons Found). या कारवाईदरम्यान तलवार, सुरी सारखे 10 शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. हे शस्त्र प्रतीक फुलझेले नावाच्या व्यक्तीच्या घरात लपवून ठेवण्यात आले होते (Dangerous Weapons Found).
नागपूरच्या गुन्हे शाखा पोलिसांच्या युनिट 5 ने एक मोठी कारवाई करत घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. आरोपी प्रतीक फुलझेले याच्या घरात तलावार, चाकुसारखे घातक शस्त्र लपवून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पेट्रोलिंगवर असलेल्या गुन्हे शाखा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला आणि त्याच्या घरातून शस्त्र हस्तगत केले. यात तलवार, चाकूसारखे 10 घातक शस्त्र मिळाले.
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. शस्त्र विषयी विचारणा केली असता ते शस्त्र मोक्काच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या रजत शर्मा नावाच्या आरोपीने ठेवण्यासाठी दिले असल्याचं प्रतीक फुलझेले याने पोलिसांना सांगितलं. मात्र, हे शस्त्र प्रतीकने त्याच्या घरी का ठेवले आणि तो काय करणार होता?, याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
नागपुरात अशा प्रकारे शस्त्र येतात कुठून आणि याचा कोणी पुरवठा करणारा आहे का, याचा शोध घेणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे.
धक्कादायक..दारुड्या मुलानं केला वडिलांचा खून, अमरावतीमधील घटनाhttps://t.co/yWuoCfHxJk #crime #murder #police
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
Dangerous Weapons Found
संबंधित बातम्या :
धारावीतून 2 कोटींचे ड्रग्ज जप्त, NCBची धडाकेबाज कारवाई
वांद्रे, पाली हिल, जुहू, खार, अंधेरीत ड्रग्जच्या रॅकेटचा पर्दाफाश, NCBची मोठी कारवाई