अरविंद सावंतांच्या नावे फेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन पैशांची मागणी, पोलिसांत तक्रार दाखल

अरविंद सावंत यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अरविंद सावंतांच्या नावे फेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन पैशांची मागणी, पोलिसांत तक्रार दाखल
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 10:45 AM

मुंबई : शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने बोगस सोशल मीडिया अकाऊंट तयार (Fake Social Media Account Of MP Arvind Sawant) करुन पैशांची मागणी केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अरविंद सावंत यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (Fake Social Media Account Of MP Arvind Sawant)

माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे दक्षिण मुंबई मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने खोटे अकाऊंट तयार करुन त्याद्वारे पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती अरविंद सावंत यांना मिळाली. त्यानंतर खुद्द अरविंद सावंत यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तसेच, नागरिकांनांही सतर्क राहण्याचं आवाहन केलं.

सावंत यांच्या नावाने त्यांची छायाचित्रे वापरुन सोशल मीडियावर खोटी खाती तयार करण्यात आली आहेत. सावंत यांची छायाचित्रे, याबाबतची माहिती यामध्ये देण्यात आली आहेत. या खात्याच्या माध्यमातून अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्टही पाठवण्यात आल्या असून त्यानंतर चॅटवर संदेश पाठवून पैसे पाठवण्याची मागणी करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

याबाबतची माहिती खासदार सावंत यांच्यापर्यंत पोचल्यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच, “अशा प्रकारची फ्रेण्ड रिक्वेस्ट अथवा पैशांसाठीचा संदेश आपल्या नावाने आल्यास कृपया त्याकडे दुर्लक्ष करावे व त्याला प्रतिसाद देऊ नये”, असे आवाहन अरविंद सावंत यांनी केले आहे (Fake Social Media Account Of MP Arvind Sawant).

Fake Social Media Account Of MP Arvind Sawant

संबंधित बातम्या :

ऑनलाईन लग्न जुळलं, पण नवरदेव आधीच विवाहित, तरुणीला फसवणारा दीड वर्षानंतर गजाआड

दुबईचं सीमकार्ड वापरत बंगळुरुतून रॅकेट ऑपरेट, नवी मुंबई पोलिसांची आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक

जमील शेखला ठार केलं, आता पुढचं टार्गेट मीच असेन : अविनाश जाधव

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.