AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस प्रवासातील ओळखीतून बाळाचं अपहरण, पुण्यातील महिला अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात

प्रवासात झालेल्या ओळखीनंतर आरोपी महिला बाळाला घेऊन खायला आणण्यासाठी निघून गेली, ती परत आलीच नव्हती.

बस प्रवासातील ओळखीतून बाळाचं अपहरण, पुण्यातील महिला अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 12:14 PM

पुणे : बस प्रवासात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन पुण्यात चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हडपसर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या काही तासात महिलेच्या मुसक्या आवळल्या. बाळाच्या 23 वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Four months old baby kidnapped in Hadapsar Pune found within a day)

अहमदनगर-सातारा महामार्गावरुन तक्रादार आणि आरोपी या दोन्ही महिला बसने प्रवास करुन आल्या. दोघींची बसमध्येच ओळख झाली होती. तक्रारदार तरुणीसोबत तिचे चार महिन्यांचे तान्हे बाळही होते. पुण्यात स्वारगेट बसस्थानक दोघीही उतरल्या आणि हडपसरला निघाल्या. प्रवासात झालेल्या ओळखीनंतर आरोपी महिलेने विश्वास संपादन करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. बाळाला घेऊन खायला आणण्यासाठी निघून गेली ती परत आलीच नव्हती.

नेमकं काय घडलं?

फिर्यादी तरुणीचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन तिने चार महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले. लोणी गावात राहणारी महिला अहमदनगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरु केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली.

काही वेळाने आरोपी महिलेने तक्रारदार तरुणीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या. तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले.

त्यानंतर आरोपी महिलेने खाऊ आणण्याचा बहाण्याने बाळाला फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरु केला. (Four months old baby kidnapped in Hadapsar Pune found within a day)

संबंधित बातम्या :

बस प्रवासात ओळख, खाऊ देण्याचा बहाणा, नगरच्या महिलेचे चार महिन्यांचे बाळ पुण्यात पळवले

फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील बाळाची चोरी; अवघ्या चार तासात चौघांना अटक

चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी पुण्याची पाषाणहृदयी आई अटकेत

(Four months old baby kidnapped in Hadapsar Pune found within a day)

अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.