लोकलमधून चोरट्याचा बिनबोभाट प्रवास; मोबाईल चोरताना प्रवाशांकडून चोप; कल्याणमधील धक्कादायक प्रकार
या चोरट्याचा ट्रेनने प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा ट्रेनमध्ये घुसला कसा, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कल्याण : सामान्य नागरिकांना ट्रेनमध्ये प्रवासाची मुभा नाही. मात्र, (Kalyan Mobile Thief Caught) चोरटा ट्रेनमध्ये प्रवास करु शकतो?, हा प्रश्न सध्या कल्याणवासियांना पडला आहे. कारण कल्याणमध्ये एका चोरट्याला ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करताना प्रवाशांनी रंगेहात पकडलं आहे. प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला. या चोरट्याला कल्याण जीआरपीने अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे (Kalyan Mobile Thief Caught).
सध्या लोकलमध्ये फार कमी प्रमाणात प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महिलांसाठी लोकल सुरु झाली. सकाळी 11 ते 3 आणि रात्री सातनंतर महिला लोकल प्रवास करु शकतात. बाकी सर्व सामान्य नागरीक लोकलमध्ये कधी प्रवास करणार या प्रतिक्षेत आहे.
प्रत्येक स्टेशनवर आरपीएफ आणि जीआरपी प्रवाश करणाऱ्या प्रवाशांचे आयकार्ड चेक करुन सोडण्यात येते. काही दिवसांपूर्वी बोगस आयकार्ड घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडले. मात्र, विनोद जाधव नावाचा एक 19 वर्षाचा तरुण ज्याकडे आधारकार्ड नाही, दुसरं काही कागदपत्रे नाहीत. तरीही तो डोंबिवलीहून ट्रेनमध्ये बसला.
रात्री एक वाजता ट्रेन बदलापूरला पोहोचणार होती. तेव्हा एका कोपऱ्यात बसलेल्या विनोदने विकास चौधरी नावाच्या प्रवाशाचा मोबाईल हिसकावून घेतला. विकास हे झोपेत होते. हा प्रकार घडताच त्यांची झोप उडाली. त्यांनी विनोदला पकडले. अन्य प्रवाशांनी विनोदला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.
कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अरशद शेख हे तपास करीत आहेत. सध्या कल्याण जीआरपीने विनोदला अटक केली आहे. विनोदकडे कोणतेही कागदपत्रे नाही. त्याने या आधी चोरी केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या चोरट्याचा ट्रेनने प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा ट्रेनमध्ये घुसला कसा, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुण्यात पावणे अकरा लाखांचे मेफेड्रॉन ड्रग जप्त, कात्रजमध्ये धाडसी कारवाईhttps://t.co/aOcXIx80W7@PuneCityPolice #MephedroneDrug
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2020
Kalyan Mobile Thief Caught
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला राजकोटमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई
क्षुल्लक कारणावरुन सासूची गळा आवळून हत्या, गोंदियातील धक्कादायक घटना
युटयूबवर व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, आरोपींना बेड्या