चोरट्यांनी भर रस्त्यात बेदम मारहाण करत लुटलं, पोलिसांनी निळ्या रंगाच्या शर्टावरुन चोरांना पकडलं

भर रस्त्यात एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन लुटणाऱ्या दोन आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे (Kalyan police arrest robbers on cleave of green colour shirt).

चोरट्यांनी भर रस्त्यात बेदम मारहाण करत लुटलं, पोलिसांनी निळ्या रंगाच्या शर्टावरुन चोरांना पकडलं
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 3:19 PM

ठाणे : भर रस्त्यात एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन लुटणाऱ्या दोन आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे एका चोरट्याने निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे, फक्त एवढीच माहिती पोलिसांकडे होती. या निळ्या रंगाच्या शर्टच्या सहाय्याने पोलिसांनी या दोघा चोरांना शोधून काढले (Kalyan police arrest robbers on cleave of green colour shirt).

कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात एका इमारतीचे काम सुरु आहे. याठिकाणी अफजल अन्सारी हे काम करतात. अफजल अन्सारी हे उल्हासनगरला राहतात. रविवारी (2 नोव्हेबर) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अफजल अन्सारी हे इंदिरानगर परिसरात पायी जात होते. यावेळी रस्त्यात दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी अन्सारी यांना हटकले. चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली.

चोरट्यांनी अन्सारी यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याचबरोबर चोरट्यांनी अन्सारी यांच्याजवळील पैसे लुटून धूम ठोकली. अफजल यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दोन्ही लुटारुंपैकी एकाने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता, अशी माहिती अफजल यांनी पोलिसांना दिली.

महात्मा पुणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर, पीआय संभाजी जाधव यांनी एक पोलीस पथक तयार करुन तपासाला सुरुवात केली. चोरट्याने निळा रंगाचा शर्ट घातला आहे, या आधाराने पोलिसांनी संपूर्ण इंद्रानगर पिंजूळ काढले (Kalyan police arrest robbers on cleave of green colour shirt).

अखेर नागरिकांच्या मदतीने निळ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या तरुणाला पोलीस कर्मचारी जेके शिंदे आणि विजय भालेराव यांनी शोधून काढले. पोलिसांनी प्रवीण चव्हाण नावाच्या तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असताना त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण आणि विकास टेमघरे या आरोपींना अटक केली.

हेही वाचा : कल्याणच्या पत्रीपुलाच्या संथगती कामामुळे नागरिक हैराण; तीव्र आंदोलनाचा इशारा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.