खंडणी न दिल्यास विकेट काढण्याची धमकी, चाकणमध्ये माथाडी संघटना अध्यक्षासह पाच जण गजाआड

म्हाळुंगे येथील कंपनीत माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी घेताना पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली

खंडणी न दिल्यास विकेट काढण्याची धमकी, चाकणमध्ये माथाडी संघटना अध्यक्षासह पाच जण गजाआड
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 6:51 PM

पिंपरी चिंचवड : चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधील माथाडीच्या नावाखाली किंवा कंपनीमधील भंगार, लेबर कंत्राटासाठी कंपनी चालकांना धमकावून खंडणी गोळा केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी दिला. त्यानंतर चाकणमधील म्हाळुंगे येथील एका कंपनीत माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी घेताना पाच जणांच्या टोळीला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. (Mathadi Sanghatna President arrested in ransom case in Chakan Pimpri Chinchwad)

अजय कौदरे, प्रदीप सोनावणे, गणेश सोनावणे, स्वप्नील पवार आणि धोंडिबा ऊर्फ हनुमंत वडजे अशी अटक करण्यात आलेलया आरोपींची नावे आहेत. या टोळीला अटक केल्याने चाकण, भोसरी ओद्यगिक वसाहतीमधील माथाडी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आरोपींनी 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरच्या दरम्यान म्हाळुंगे येथील एका कंपनीमध्ये येऊन उद्योजकाला धमकी दिली की, कंपनी चालवायची असेल तर वेदांत एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीच्या एका प्रतिनिधीला कामावर घ्या, तो कामावर येणार नाही मात्र त्याचा पगार आणि इतर देणी असे मिळून दरमहा 20 हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुमची विकेट काढेल, अशी धमकी दिली.

या प्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधींनी म्हाळुंगे पोलीस चौकीत तक्रार दिली. या तक्रारीची तत्काळ दखल घेत म्हाळुंगे पोलिसांनी सापळा रचून 20 हजारांची खंडणी घेताना माथाडी संघटनेचा अध्यक्ष अजय कौदरे, प्रदीप सोनावणे आणि गणेश सोनावणे या तिघांना जागेवरच अटक केली. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्वप्नील पवार आणि धोंडिबा वडजे या दोघांनाही अटक केली.

चाकण ओद्यगिक पट्ट्यात असे अनेक लघु आणि मध्यम उद्योग कार्यरत असून या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र भीतीपोटी उद्योजक हे तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्याने या पट्ट्यामध्ये खंडणीखोरांचा सुळसुळाट झाला आहे.

ओद्यगिक वसाहतीत अनेक खंडणीबहाद्दर कार्यरत असून कुठल्याही टोळीकडून आणखी कोणाला धमकावून खंडणी घेत असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी निर्धास्तपणे पुढे यावे, असे आवाहन पोलीस उपायुक्‍त मंचक इप्पर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुंडांची भरवस्तीत वरात, वाकड पोलिसांची दबंग कारवाई

(Mathadi Sanghatna President arrested in ransom case in Chakan Pimpri Chinchwad)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.