मुंबईत दारुड्यांचं धक्कादायक कृत्य, 76 वर्षीय वृद्धाची काच आणि दगडाने ठेचून हत्या
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या काळात गुन्ह्यांचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. आताही असाच गंभीर प्रकार मुंबईच्या मुलुंडमध्ये समोर आला आहे. मुलुंडमध्ये एका 76 वर्षीय वृद्धाचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Mumbai murder news 76 man murder in mulund)
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती लक्ष्मण गवळी असं मयत इसमाचं नाव असून ते विजय नगर परिसरामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. पण रात्री झोपण्यासाठी ते हंसा विलामधील सिल्वर क्लास हाऊसजवळ जायचे. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांचा हा नित्यक्रम होता. पण शुक्रवारची पहाट मात्र या परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक ठरली.
मारुती गवळी यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील काही नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. तात्काळ याची माहिती मुलुंड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जागेचा पंचनामा केला. यावेळी मारुती गवळी यांच्या शरीरावर जवळच असलेल्या काचेच्या सहाय्याने वार केले असल्याचं दिसून आलं. सोबतच त्यांच्या जवळ रक्ताने माखलेला दगड देखील दिसून आला. (Mumbai murder news 76 man murder in mulund)
काचेच्या सहाय्याने आणि दगडाने ठेचून त्यांची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. दरम्यान मारुती गवळी ज्या ठिकाणी झोपायचे त्या परिसरामध्ये दारुड्यांचा अड्डा असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्याने दारुच्या नशेत हे धक्कादायक कृत्य केलं असावं असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
इतर बातम्या –
6 महिन्यानंतर आली Good News, देशात पुन्हा एकदा निर्यातीमध्ये वाढ
पोलिसांनी धमकावलं, पीडित कुटुंबाचा गंभीर आरोप; हाथरसमधून ‘टीव्ही9 मराठी’चा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
Sushant Singh Rajput |सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावाhttps://t.co/Qw0tSL9yrb#SushantSinghRajput #AIIMS #AIIMSReport #SushantSinghRajputCase
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 3, 2020
(Mumbai murder news 76 man murder in mulund)