sanitizer | दारु न मिळाल्याने सॅनिटायजर प्यायला, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू
नागपुरात दारुऐवजी सॅनिटायजर प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गौतम गोस्वामी असं 45 वर्षीय मृत्यू झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे.
नागपूर : नागपुरात दारुऐवजी सॅनिटायजर प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गौतम गोस्वामी असं 45 वर्षीय मृत्यू झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गंगाबाई घाट परिसरात तो राहत होता. या व्यक्तीला दारुचं व्यसन होतं. तो महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम कर होता. सध्या दारुची दुकानं बंद असल्यानं तो सॅनिटाईजर प्यायचा. यामुळं आठ दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला. (Man dies after drinking sanitizer)
या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोक व्यसनासाठी कोणत्या थराला जात आहेत, हे यावरुन स्पष्ट होतं. दारुची नशा भागवण्यासाठी चक्क सॅनिटायजर पिण्याचं जीवघेणं धाडस करत आहेत. नशेसाठी जीवाची पर्वा करत नसल्याचं चित्र आहे. मात्र असे जीवघेणे प्रकार करु नये असं आवाहन सातत्याने केलं जात आहे.
साताऱ्यातही दोघांचा मृत्यू
दोन महिन्यापूर्वी साताऱ्यातही अशीच धक्कादायक घटना घडली होती. लॉकडाऊनमध्ये मद्यपी दारुऐवजी सॅनिटायझरचं सेवन करत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्या होत्या. यादरम्यान, लॉकडाऊनच्या काळात दारु न मिळाल्याने अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर पिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये (Drinking Sanitizer Instead Of Liquor) ही घटना घडली होती.
(Man dies after drinking sanitizer)
संबंधित बातम्या
साताऱ्यात सॅनिटायझर प्यायल्याने दोघांचा मृत्यू, लॉकडाऊनमध्ये दारु न मिळाल्याने धीर सुटला