Maharashtra Board Results 2024 : दहावी, बारावीच्या निकालाबद्दल अपडेट, कधी लागणार निकाल, निकाल पाहण्यासाठी ‘या’ साईटला..

10th and 12th result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाची वाट गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी बघत आहेत. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आता सर्वांना वेध लागलेत ते म्हणजे निकालाचे. दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये.

Maharashtra Board Results 2024 : दहावी, बारावीच्या निकालाबद्दल अपडेट, कधी लागणार निकाल, निकाल पाहण्यासाठी 'या' साईटला..
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 2:53 PM

दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाही काॅपीमुक्त परीक्षा झाल्यात. मंडळाकडून कित्येक महिन्यांपासून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी काम सुरू होते. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे या परीक्षेच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच निकाल हा जाहिर केला जाऊ शकतो. अगोदर बारावीचा निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहिर होऊ शकतो.

विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार यंदा दहावी आणि बारावीचा निकाल हा ‘मे’च्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात नाही आली.

रिपोर्टनुसार ‘मे’च्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहिर होऊ शकतो, यामध्ये बदलही होऊ शकतो. लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहिर होण्याच्या अगोदर दहावी आणि बारावीचे निकाल जाहिर होऊ शकतात. राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाली होती. 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते.

दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. दुसरीकडे दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.

हेच नाही तर परीक्षा केंद्रांवर तगडा बंदोबस्त देखील बघायला मिळाला. भरारी पथकांमध्येही मोठी वाढ करण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांसह पालकांना फक्त आणि फक्त परीक्षेच्या निकालाचे वेध लागल्याचे बघायला मिळत आहे. एकदा निकाल लागला की, विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ प्रवेशासाठी सुरू होते. यंदा निकालाचा टक्का वाढणार का? हे देखील पाहण्यासारखे नक्कीच ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.