11th Admissions: कोट्यातून प्रवेश सुद्धा ऑनलाइनच! जे विद्यालय मिळेल तिथे प्रवेश घेणं अनिवार्य, महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
11th Admissions: ऑनलाईन अर्जाच्या भाग-2 मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइनसह इनहाऊस, अल्पसंख्याक, मॅनेजमेंट यांपैकी पर्याय निवडता येणार असून कोट्याद्वारे प्रवेशासाठी कॉलेज प्राधान्यक्रमही द्यावे लागणार आहेत. शून्य फेरी वेळी विद्यार्थ्यांना कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरता येतील.
मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 17 जूनला दहावीचा निकाल (SSC Results) जाहीर करण्यात आला होता. परंतु सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर न झाल्यामुळे हे विद्यार्थी तब्बल एक महिना अकरावी प्रवेशाचा अर्जाचा भाग 1 भरून, भाग 2 ची प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. आता सगळ्याच बोर्डाच्या दहावीचे निकाल लागलेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाची घाई सुरू झालीये. यंदा अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं सुरु करण्यात आलेत, अकरावीचे कोट्यातले (11th Quota Admissions) प्रवेश सुद्धा ऑनलाइनच सुरु करण्यात आलेत. विद्यार्थ्यांना कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी सुद्धा पसंतीक्रमांक (11th Admission College Preferences) भरावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्जाच्या भाग-2 मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइनसह इनहाऊस, अल्पसंख्याक, मॅनेजमेंट यांपैकी पर्याय निवडता येणार असून कोट्याद्वारे प्रवेशासाठी कॉलेज प्राधान्यक्रमही द्यावे लागणार आहेत. शून्य फेरी वेळी विद्यार्थ्यांना कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरता येतील.
कोट्यातील कॉलेज पसंतीक्रमही ऑनलाईन अर्जात नोंदवावे लागणार
विद्यार्थी कोणत्या कोट्यातून प्रवेश घेण्यास उत्सुक आहे त्या कोट्याचा पर्याय ऑनलाईन अर्जात द्यावा लागत होता. विद्यार्थ्यांनी कॉलेजस्तरावर कोट्यातून प्रवेश घेतल्यानंतर संबंधित कॉलेजकडून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नोंद ऑनलाईन करण्यात येत होती. या पद्धतीत यंदा बदल करण्यात आलेला असून अपेक्षित कोटा निवडण्याबरोबच विद्यार्थ्याला त्या कोट्यातील कॉलेज पसंतीक्रमही ऑनलाईन अर्जात नोंदवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या कॉलेज पसंतीक्रमानुसार संबंधित कॉलेजांना विद्यार्थ्यांची यादी पाठविली जाणार आहे. या यादीप्रमाणे कॉलेजांनी त्या कोट्यातील उपलब्ध जागांनुसार गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश द्यायचे आहेत.
3 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी
- अकरावी ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण यादी- 28 जुलै
- अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी- 3 ऑगस्ट
- हे वेळापत्रक मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर यापासून महानगरपालिका क्षेत्रासाठी
- ३ ऑगस्ट रोजी ज्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पसंतीक्रम भरुन अंतिम केले आहेत अशा विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळणार
- या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार
- ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय मिळालेले आहे त्यांनी तिथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे.
कोटा प्रवेशात झालेला बदल
- शून्य फेरी वेळी कोट्यांतर्गत ऑनलाईन अप्लाय करता येणार.
- विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचा भाग दोन भरतानाच त्यांना प्रवेश घेण्यासाठी अपेक्षित कोट्याचा पर्याय निवडावा लागेल.
- कोटा निवडल्यानंतर त्या कोट्यातील उपलब्ध कॉलेजांचे पसंतीक्रमही भरावे लागणार आहेत.
- पसंतीक्रमानुसार संबंधित कॉलेजांना विद्यार्थ्यांची यादी पाठविली जाईल. यादीप्रमाणे कॉलेजांनी त्या कोट्यातील उपलब्ध जागांनुसार गुणवत्ता यादी जाहीर करावी.
कोटांतर्गत प्रवेश असे होणार
- 25 ते 27 जुलै – कोटांतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदविणे ॥
- 28 जुलै – प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे
- 28 जुलै ते 30 जुलै प्रवेश निश्चिती करणे
- 31 जुलै ते 2 ऑगस्ट – कोटानिहाय रिक्त जागा विद्यालय स्तरावर जाहीर करणे आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा पसंती नोंदविणे
- 3 ऑगस्ट – कोटांतर्गत पात्र विद्यार्थी यादी जाहीर करणे
- 3 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट – पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे