11th Admission: अकरावी प्रवेशासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी भाग 2 भरलेले नाहीत, मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना अजूनही तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थी दहावीत असताना शाळा स्तरावर प्रवेशासंदर्भातील मार्गदर्शन केले नसल्याने यावर्षी प्रवेशात गोंधळाची मालिका सुरु आहे.
मुंबई: अकरावी प्रवेशात (11th Entrance) मुंबई विभागात एमएमआर क्षेत्रात प्रत्यक्षात 3 लाख 8 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज लॉक केलेले नाहीत व भाग 2 भरलेले नाहीत असे तब्बल 50 हजारहून अधिक विद्यार्थी पहिल्या यादीपासून दूर आहेत. तब्बल 50 हजार विद्यार्थी गेले कुठे? असा प्रश्न पडला आहे. अकरावीला प्रवेश घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची माहिती मिळत नसल्याने अकरावी (11th) प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना अजूनही तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थी दहावीत असताना शाळा स्तरावर प्रवेशासंदर्भातील मार्गदर्शन (Guidance) केले नसल्याने यावर्षी प्रवेशात गोंधळाची मालिका सुरु आहे.
734 तक्रारी प्राप्त
दरवर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी घेवून कोट्यवधी रुपये शालेय शिक्षण विभागाकडे जमा होतात. विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती का दिली जात नाही असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी संघटनांनी उपस्थित करत आहेत. 734 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये मुंबईत आहे. दहावीत असताना विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती पूर्वी दिली जात होती. अनेक शाळांत विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्ज कसा भरायचा, पसंतीक्रम कसे भरायचे तसेच माहिती तपासून अर्जाला मंजूरी ही प्रक्रिया माध्यमिक शाळेत चालत होती. गेले काही वर्ष याकडे शालेय शिक्षण विभागाने गांभीर्याने पाहिलेले नाही. शिक्षण उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा होती त्यावेळी सर्व प्रक्रिया होती. आता सर्व शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षण संचालयाकडे ही जबाबदारी सोपवली आहे. यामुळे अकरावी प्रवेशात सावळा गोंधळ सुरु असल्याचे चित्र आहे.
नियोजनाअभावी गोंधळ
दहावीचा निकाल जाहीर झाला. प्रवेश अर्जाचा पहिला टप्पाही भरला. मात्र तो अंतिम कसा करायचा ही माहिती मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी पहिल्या यादीपासून दूर आहेत. पार्ट 1 अर्ज आलेल्या विद्यार्थ्यांना दोन दिवसाची मुदतवाढ पालकांच्या मागणीनुसार नोंदणी केलेली नाही. दोन दिवसात 2 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम झाली. नियोजनाअभावी गोंधळ पहायाला मिळतो. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून २२५ रुपये नोंदणी फी घेतली जाते. शालेय शिक्षण विभाग दरवर्षी कोट्यवधी रुपये लाखो विद्यार्थ्यांच्या नोंदणी फीमधून जमा करते. मात्र फिच्या तुलनेत विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही. ऑनलाइन परिपत्रक टाकली जातात आणि त्यातून प्रवेश घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. पालक, विद्यार्थ्यांना याची माहितीही नसते. प्रवेशाच्या वेळी तक्रारी घेवून आलेल्या पालकांच्या रांगा उपसंचालक कार्यालयाबाहेर सुरु झाल्या आहेत. संकेतस्थळावरही सुमारे तांत्रिक कारणे सांगणारी 242 आहेत.
परिपत्रकांची माहिती उशिरा
विद्यार्थ्यांना सूचना देताना वेळापत्रक व अन्य माहिती देण्यासाठी परिपत्रके जारी केली जातात. मात्र ती परिपत्रके रात्री अपलोड केली जातात. त्या परिपत्रकाची अंमलबजावणी मात्र सकाळपासूनची असते. यामुळे विद्यार्थी पालकांना माहितीही नसते. माहिती नसल्याने एक दिवसाचा कालावधी वाया गेलेला असतो. शिक्षण उपसंचालकांनी तरी माहिती तातडीने शाळा व महाविद्यालयांना द्यावी अशी मागणी होत आहे.