बारावी उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय झाले? मंडळाने काय घेतला निर्णय
Maharashtra Board HSC Result 2023 : राज्य मंडळाचा बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. या निकालानंतर हस्ताक्षर बदल झालेल्या त्या विद्यार्थ्यांसोबत काय निर्णय झाला, याची उत्सुक्ता सर्वांना होती. त्यावर बोर्डाने निर्णय घेतला आहे.
दत्ता कनवटे, संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. दुपारी २ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. यंद निकाल 91.25 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 2.97 टक्क्यांनी घट झाली आहे. पण या निकालासोबत अजून एक उत्सुक्ता होती. त्यासंदर्भात बोर्डाने निर्णय घेतला आहे. बारावी भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल झालेल्या त्या सर्व विद्यार्थ्यांचा निकालाबाबत बोर्डाने निर्णय घेतला आहे.
काय घेतला निर्णय
बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळले. एकाच संस्थेच्या दोन कॉलेजकडे या उत्तरपत्रिका गेल्या होत्या. या प्रकरणी मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या हस्ताक्षर बदल झालेल्या 396 विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाने जारी केला आहे.
बोर्ड करणार गुन्हा दाखल
बोर्डाला 396 विद्यार्थ्यांचा उत्तरपात्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळून आले. यानंतर या प्रकरणी बोर्डाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हस्ताक्षर बदल प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने प्रकरणाचे सर्व धागेधोर उघड होणार आहे.
कसा दिला निकाल
बोर्डाने त्या 396 विद्यार्थ्यांचा निकाल दिला आहे. परंतु बदललेले हस्ताक्षर ग्राह्य न पकडता मूळ उत्तरपत्रिकेवरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
बारावीचा विभागवार निकाल
कोकण 96.01 टक्के पुणे 93.34 टक्के कोल्हापूर 93.28 टक्के औरंगाबाद 91.85 टक्के नागपूर 90.35 टक्के अमरावती 92.75 टक्के नाशिक 91.66 टक्के लातूर 90.37 टक्के मुंबई 88.13 टक्के
कुठे पाहता येईल निकाल ?
SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
हे ही वाचा
Courses After HSC : बारावीनंतर काय? एका चार्टमधून जाणून घ्या सर्व अभ्यासक्रमांची माहिती