कमालच झाली, बापाने पोरीला अभ्यास शिकविताना NEET UG 2024 ची परीक्षा उत्तीर्ण केली

जर पालकांनी खरंच मुलांसाठी वेळ काढला त्यांची तयारी करुन घेतली तर त्यांना अभ्यासक्रम कळायला सोपे जाते असे विकास मंगोत्रा यांनी सांगितले. साल 2022 च्या तुलनेत यंदाची नीटची परीक्षा थोडी सोपी वाटल्याचेही त्यांनी सांगितले.

कमालच झाली, बापाने पोरीला अभ्यास शिकविताना NEET UG 2024 ची परीक्षा उत्तीर्ण केली
Vikas Mangotra and his daughter mimansa
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 1:13 PM

मुलांसाठी आपला बाप कायम हिरो असतो. बाप मुलीसाठी काहीही करु शकतो. याचे एक जीतं जागतं उदाहरण घडले आहे. एका बापाने मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्यासाठी अन्य दुसऱ्या संस्थेतून NEET UG 2024 परीक्षा उत्तीर्ण करुन दाखविली आहे. या बापलेकीचे सर्वत्र कौतूक होत आहे. मुलीला अभ्यास शिकविता माझीही तयारी झाली होती. शेवटी मुलीसाठी परीक्षा देखील दिली आणि उत्तीर्ण झाल्याचे सांगताना या बापाला चेहऱ्यावर समाधान झळकले.

सध्या वैद्यकीय जागांसाठी घेतलेल्या नीट परिक्षेतील गुणदान आणि गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरुन वातावरण तापले आहे. नीटची परीक्षा उच्च दर्जाची स्पर्धात्मक परीक्षा आहे. मुलीला जेव्हा मी नीट एक्झामबद्दल त्यातील तिला न समजलेल्या प्रश्नांबद्दल शिकविले तेव्हा तिला आपल्या वडीलांना अजूनही सर्व अभ्यास लक्षात आहे हे पाहून खूप आश्चर्य वाटल्याचे दिल्लीतील कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी असलेल्या विकास मंगोत्रा यांनी सांगितले. या बापलेकांनी दिल्लीच्या दोन वेगवेगळ्या सेंटरमधून नीटची परीक्षा दिली. विकास यांनी ग्रेटर नोएडा येथून तर मुलगी मिमांसा ( 18 ) हीने नोएडातून NEET UG 2024 ही परीक्षा दिली आहे.

शिकविण्याची आवड

विकास मंगोत्रा हे मुळचे जम्मूचे असून ते 2022 साली देखील नीटची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आपण स्टेट पीएमटी 90 च्या दशकात दिली होती. मला डॉक्टर व्हायचे होते. आणि आपण तेवढे गुणही मिळविले होते. परंतू काही पर्सनल कारणांनी आपण दुसऱ्या इंजिनिअरींगकडे वळल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी केवळ नीटच नाही तर GATE, JKCET, आणि UPSC CSE परीक्षा गेल्या दोन दशकात दिल्या आहेत. पहिल्यांदा आपण जेव्हा 2022 मध्ये मी नीट दिली तेव्हा मला माझी क्षमता तपासायची होती. त्यानंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण परीक्षा देऊ शकतो. दुसऱ्यांदा 2024 ला नीट 2024 परीक्षा मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली आणि माझी शिकविण्याची क्षमता वाढविण्यासाठी दिल्याचे विकास यांनी सांगितले.

ग्रेस मार्काच्या आरोपावर नाराज

मला सुरुवातीला माझ्या वयाचा विचार आला होता. परंतू ओदिशाच्या 60 वर्षांच्या इसमाने साल 2021 मध्ये नीट क्लीअर केल्याचे आपण जेव्हा ऐकले तेव्हा नीटची परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. साल 2022 च्या नीटसाठी आपण केवळ चार महिने अभ्यास करायचो असे विकास मंगोत्रा यांनी सांगितले. यंदाच्या नीट साठी ऑफीसचे काम संपल्यानंतर आपण घरी येऊन 15 ते 16 तास नीटची तयारी करायचो. शाळेतील दिवसांपासून आपल्याला शिकविण्याची आवड होती. माझी मुलगी मिमांसा हीने परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्षे ड्रॉप घेतला होता. जेव्हा मी तिला शिकवायला सुरुवात केली तेव्हा या परीक्षेतील आव्हाने तिला समजली. नीट परीक्षेच्या मुलांना ग्रेस मार्क आंदण दिल्याच्या आरोपावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.