जिकडे सूर्य तिकडेच सूर्यफुलाचं तोंड का? सूर्य इतका आवडायचं कारण काय? इंटरेस्टींग फॅक्ट
सूर्यफूल फूल थंडीपेक्षा उन्हाळ्यात जास्त सक्रिय असते. 6 तासांपेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाश बाहेर पडणाऱ्या भागात या फुलांची वाढ जास्त होते.
सूर्यफुलाबदल आपल्याला एक वेगळंच आकर्षण असतं नाही का? जिकडे सूर्य तिकडे सूर्यफुलाचं तोंड! हे ऐकायला, वाचायला खूप इंटरेस्टींग आहे.पण यामागचं कारण किती जणांना माहित आहे? टवटवीत पिवळ्या रंगाचं सूर्यफूल सूर्याच्या दिशेला का तोंड करून येतं? सूर्यफुलाची फुले ही सूर्य ज्या दिशेने जात राहतात त्याच दिशेने फिरतात, याचे कारण काय?
सूर्यफूल फूल थंडीपेक्षा उन्हाळ्यात जास्त सक्रिय असते. 6 तासांपेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाश बाहेर पडणाऱ्या भागात या फुलांची वाढ जास्त होते.
हळूहळू सूर्याच्या दिशेबरोबर त्यांची दिशाही बदलते. हे होण्यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हेलिओ ट्रॉपिझम.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हेलिओ ट्रॉपिझममुळे हे होते आणि यामुळेच सूर्यफूल फुले सूर्याच्या दिशेने तोंड देतात. सूर्या जेव्हा पश्चिमेला मावळतो त्यावेळेत सुद्धा या फुलांची दिशा पश्चिमेकडे होते.
सूर्यफूल रात्री पुन्हा पूर्वेकडे आपली दिशा बदलून दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याची वाट पाहतात. हे सगळं सातत्याने सुरू असतं. मग आता हेलिओ ट्रॉपिझम म्हणजे काय? ते समजून घेऊ…
ज्याप्रमाणे माणसांमध्ये जैविक घड्याळ ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो, त्याचप्रमाणे सूर्यफूल फुलांमध्येही हेलियो ट्रोपिझम म्हणतात. हेलियो ट्रोपिझम सूर्याची किरणे शोधून काढते आणि फुलाला सूर्य असलेल्या बाजूला वळण्यास प्रवृत्त करते.
सूर्यफुले रात्री विश्रांती घेतात आणि दिवसा सूर्यप्रकाश मिळताच सक्रिय होतात असं एका संशोधनात सांगण्यात आलंय. जसजसा सूर्यप्रकाश तीव्र होत जातो, तसतशी सूर्यफुलाच्या फुलांची क्रियाशीलताही वाढते.हे सगळं हेलिओ ट्रोपिझममुळे शक्य होतं.