IAS पूजा खेडकर यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाल्यावर काय होणार?, त्या तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास…

IAS पूजा खेडकर यांचे प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे. पूजा खेडकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप हे करण्यात आले. पूजा खेडकर यांचे पाय खोलात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हेच नाहीतर पूजा खेडकर यांची चाैकशी देखील होणार आहे. पूजा खेडकर यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

IAS पूजा खेडकर यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाल्यावर काय होणार?, त्या तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास...
IAS Pooja Khedkar
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 6:54 PM

IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर या तूफान चर्चेत आहेत. प्रबोशनमध्ये असताना विशेष अधिकारांची मागणी त्यांनी केली. लाल दिव्याची गाडी, व्हीआयपी नंबर प्लेट, खासगी ऑडी कारवर यामुळे त्या चर्चेत आल्या. आता पूजा खेडकर यांचे पाय अधिकच खोलात असल्याचे बघायला मिळतंय. IAS पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांकडे 110 एकर जमीन, 7 फ्लॅट्स, 1 लाख स्केअर फुटाची 6 दुकाने आहेत. स्वत: पूजा खेडकर यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती आहे. तर पूजाचे वडिलांनी निवडणूक शपथपत्रात 40 कोटींची संपत्ती दाखवली होती.

दुसरीकडे पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलेअर ओबीसींमधून काढले होते. त्यामध्ये त्यांनी वर्षाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षाही कमी दाखवले. पूजा खेडकरला ऑल इंडिया 841 रैंक मिळाले. या रँकवर आयएसएस कॅडर उपलब्ध नसले तरी पूजा खेडकर यांना आयएएस कॅडर मिळाले आहे. यामुळेच आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

पूजा खेडकर याने यूपीएससी परीक्षेदरम्यान दावा केला होता की, त्या नॉनक्रिमी लेयर ओबीसी आहेत. याशिवाय पूजा खेडकरने ती दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावाही केला होता. पूजाने यूपीएससीकडे प्रमाणपत्रही जमा केले होते. यूपीएससीने पूजाचे मेडिकल करवून घेण्याबाबत बोलले तेव्हा पूजाने कोरोनाचे कारण देत वैद्यकीय तपासणीस नकार दिला.

आता या प्रकरणात खेडकर कुटुंबियांच्या समस्या या चांगल्याच वाढल्याचे बघायला मिळतंय. या प्रकरणात आता याची चौकशी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केली जात असून  दोन आठवड्यांत अहवाल सादर करावा लागेल. अहवालात पूजावरील हे आरोप खरे ठरले तर तिच्यावर मोठी कारवाई केली जाईल. 

पूजा खेडकर यांच्यावर भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 318 (4), कलम 336 (3) आणि कलम 340 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ही कलमे फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि बनावट कागदपत्रे यांच्याशी संबंधित आहेत. ज्यामध्ये पूजा या दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. नोकरी तर जाणारच . आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने होते, त्यामुळे पूजाला केवळ राष्ट्रपतीच बडतर्फ करू शकतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.