यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा ॲसिड हल्ल्याचा बनाव, असा उघड झाला प्रकार…

यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीने मोठा बनाव केला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केलाय. मित्राने वापरण्यास दिलेला लॅपटॉप या विद्यार्थीने विकला. त्यानंतर तिने पुढे जे हैराण करणारी गोष्टी केली जाणार मोठी खळबळ बघायला मिळाली. आता पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केलाय.

यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा ॲसिड हल्ल्याचा बनाव, असा उघड झाला प्रकार...
Kalyan police
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 3:11 PM

सध्याच्या काळामध्ये अनेक सामान्य वर्गातील लोकांना महागाईचा फटका सोसावा लागत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामधूनच खर्च परवडत नसल्यामुळे आणि यूपीएसची तयारीसाठी पैसे पाहिजे असल्याने आर्थिक चणचनीतून कल्याणमधील एका यूपीएससीच्या विद्यार्थिनी अजब चोरी केली आहे . कल्याणमधील या तरुणीने मित्राचा लॅपटॉप परस्पर विकूननंतर मित्रासमोर ॲसिड हल्ला करत लॅपटॉप लुटल्याचा बनाव रचला. कल्याण कोळसवाडी पोलीस तालुक्यात तक्रार देखील दिली.

पोलिसांनी तपास करत तिचा बनाव उघडकीस आणत तिने विक्री केलेल्या दुकानदाराकडून लॅपटॉप जप्त करत पुढचा तपास सुरू केला आहे. अंजली पांडे तरुणीचे नाव आहे. अंजली पांडे नावाची तरुणी अंधेरी येथे राहत होती. ती यूपीएससी परिक्षेची तयारी करत होती. तिचा मित्र कल्याणमध्ये राहतो.

यूपीएससीची तयारी करण्यासाठी तिने तिच्या मित्राकडून लॅपटॉप घेतला. तिला यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी व इतर गोष्टीसाठी पैशाची चणचण होती. तिने मित्राकडून घेतलेला लॅपटॉप एका दुकानदाराला 44 हजाराला विकून टाकला. आत्ता तो मित्र लॅपटॉप परत मागत होता. विकलेला लॅपटॉप कसा परत द्यायचा? त्याला द्यायला पैसैही नाही. यामुळे अंजली हिने एक कट रचला.

कल्याणला येऊन तिने एका दुकानातून कास्टींग सोडा घेतला. ज्या दुकानातून सोडा खरेदी केला आणि स्वतःच्या अंगावर टाकून आपल्यावर ॲसिड हल्ला करत दोन बाईकवाल्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याचा बनाव केला. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना चौकशीत कल्याण पश्चिमेतील एका दुकानातून या तरुणीने कास्टीग सोडा घेतल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तिची चौकशी केली असता अंजलीने मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकला असून तो परत करता येत नसल्याने तिने हा कट रचल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तो लॅपटॉप दुकानदाराकडून जप्त करत या प्रकरणात खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याने तरुणीच्या विरोधात ठोस कारवाई करण्यास सुरूवात केलीये.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.