Varsha Gaikwad : सावित्रीबाई फुलेंच्या नावे मिळणार आदर्श शिक्षक पुरस्कार, निकषात शिक्षण विभागाने केलेत बदल

शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या निकषात बदल करण्यात आलेत. यामुळं शिक्षणाभीभूख शिक्षकांना या पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. वादग्रस्त शिक्षक हे यासाठी अपात्र ठरविले जातील. शिक्षकाविरोधात विभागीय चौकशी सुरू नसावी. तसेच संबंधित शिक्षक हा व्यसनी नसावा, असं नव्या निकषात सांगण्यात आलंय.

Varsha Gaikwad : सावित्रीबाई फुलेंच्या नावे मिळणार आदर्श शिक्षक पुरस्कार, निकषात शिक्षण विभागाने केलेत बदल
सावित्रीबाई फुलेंच्या नावे मिळणार आदर्श शिक्षक पुरस्कार
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 6:25 PM

मुंबई : शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय घेतला. त्यानुसार, आदर्श शिक्षक पुरस्काराचे (Adarsh ​​Shikshak Puraskar) निकष नुकतेच जाहीर केले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिलीय. समर्पित शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान केला जाणार आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराला अधिक शिक्षणाभीमूख केले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जाणाराय. राज्यातल्या 109 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरविण्यात येणाराय. यात प्राथमिक शाळेतील 38, माध्यमिक 39, आदिवासी क्षेत्र 8, आदर्श शिक्षिका 8, विशेष कला, क्रीडा शिक्षक 2, दिव्यांग 1, स्काऊट गाईड 2 यांचा समावेश राहणार आहे. जिल्हा निवड समितीनं (District Selection Committee) राज्य निवड समितीकडं शिफारशी पाठवायच्या आहेत.

या गोष्टींचा विचार केला जाणार

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्यामार्फत पुरस्काराची निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. शिक्षकानं शैक्षणिक संशोधनपर निबंध लिहिलेले असावेत. शिक्षक शिकवित असलेल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार मिळालेले असावेत. सामाजिक, शैक्षणिक, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय कार्यात सहभाग हवा. राष्ट्रीय शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल, याचाही विचार केला जाईल. शिक्षकानं मिळविलेली रक्कम डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी वापरावी.

आदर्श शिक्षकांचे निकष कोणते

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारात शालेय शिक्षण विभागानं बदल केलाय. आदर्श शिक्षक पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार नावानं दिला जाणार. यासाठी निकष असे सलग दहा वर्षे शिक्षक म्हणून काम हवं. मुख्याध्यापकपदी सेवा पूर्ण करणारे असावेत. माहिती खोटी आढळल्यास प्रस्ताव रद्द करण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरू नसावी. निरव्यसनी शिक्षकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. गेल्या पाच वर्षात किती विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले याचा विचार पुरस्कार देताना केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

व्यसनी शिक्षक ठरणार अपात्र

शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या निकषात बदल करण्यात आलेत. यामुळं शिक्षणाभीभूख शिक्षकांना या पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. वादग्रस्त शिक्षक हे यासाठी अपात्र ठरविले जातील. शिक्षकाविरोधात विभागीय चौकशी सुरू नसावी. तसेच संबंधित शिक्षक हा व्यसनी नसावा, असं नव्या निकषात सांगण्यात आलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.