ITI Entrance: आयटीआय साठी आजपासून प्रवेश सुरु! दहावीच्या निकाल लागला की लगेच अर्ज भरून टाका
सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर पहिल्या फेरीसाठी अर्ज निश्चित करण्यात येणार आहेत याबद्दलची माहिती आयटीआयचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिलीये.
आजपासून आयटीआय (ITI) ची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. यंदा आयटीआयमध्ये मिळून एक लाख 49 हजार 268 जागांवर प्रवेशप्रक्रिया होणार आहे सरकारी आणि खासगी आयटीआय मिळून या जागा असणार आहेत. 17 जूनपासून म्हणजेच आजपासून ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज (Entrance Application) फी भरणे या सगळ्यासाठी आजपासून सुरुवात होणार आहे. 22 जून नंतर मूळ कागदपत्र तपासल्यानंतर पहिल्या फेरीसाठी सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मूळ कागदपत्रांच्या (Original Documents) तपासणीनंतर पहिल्या फेरीसाठी अर्ज निश्चित करण्यात येणार आहेत याबद्दलची माहिती आयटीआयचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिलीये.
या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन
आज दहावीचा निकाल लागणार आणि आजच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालया (DVET) च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आयटीआय प्रवेशाच्या सविस्तर माहिती आणि वेळापत्रकासाठी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन डीव्हीईटी प्रशासनाकडून करण्यात आलंय. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना एक महिन्याची मुदत राहणार आहे. परवानगी मिळाल्यास ही मुदत वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील आयटीआय प्रवेशाची स्थिती
आयटीआयचे प्रकार आयटीआयची संख्या एकूण जागा
- सरकारी आयटीआय – 419 / एकूण जागा – 93,904
- खासगी आयटीआय – 553 / एकूण जागा- 55,364
- एकूण आयटीआय – 972 / एकूण जागा- 1,49,268
स्थानिक स्तरावर सुद्धा रोजगार उपलब्ध
राज्यातील आयटीआयमध्ये पारंपरिक शाखेच्या अभ्यासक्रमांसोबतच नावीन्यपूर्ण रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षात आयटी, कम्प्युटर, एअररोनॉटिक्स, रोबोटिक्स अशा विषयांना धरून अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुढे चांगली रोजगाराची संधी मिळते. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर सुद्धा रोजगार उपलब्ध आहेत. अकरावी आणि इंजिनिअरिंगला प्रवेश न घेणारे विद्यार्थी ठरवून आयटीआयला प्रवेश घेतात. यंदा सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून एक लाख 49 हजार 268 जागांवर प्रवेशप्रक्रिया होईल.
इथे तपासा दहावीचा निकाल
https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th