AICTE Academic Calendar:अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून वार्षिक वेळापत्रक जाहीर, ‘इथे’ पाहा

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच ऑल इंडियन काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वतीनं शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी अकॅडमिक कॅलेंडर जारी केलं आहे.

AICTE Academic Calendar:अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून वार्षिक वेळापत्रक जाहीर,  'इथे' पाहा
AICTE
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 10:31 AM

नवी दिल्ली: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच ऑल इंडियन काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वतीनं शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी अकॅडमिक कॅलेंडर जारी केलं आहे. अकॅडमिक कॅलेंडरनुसार पीजीडीएम आणि पीजीसीएम या अभ्यासक्रमांचे वर्ग 2 ऑग्सटपासून सुरु झाल्याचं सांगण्यात आलंय.

पहिल्या वर्षाचे 25 ऑक्टोबरपर्यंत वर्ग सुरु करा

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्यावतीनं सर्व संलग्न विद्यापीठ आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम चालवणारी महाविद्यालयं यांना 25 ऑक्टोबरपर्यंत वर्ग सुरु करण्यास सांगितलं आहे. तर, लॅटरल एंट्रीद्वारे दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमांचे प्रवेश 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे.

30 सप्टेंबरपर्यंत समुपदेशन आणि पहिल्या फेरीचे प्रवेश

पहिल्या फेरीचे प्रवेश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहेत. तर, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशन देखील 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावं, असं देखील सांगण्यात आलंय.

पीजीडीएम आणि पीजीसीएम संस्थांमधील प्रवेशांसाठी अखेरचा दिनांक 11 ऑगस्ट देण्यात आला होता. तर, दुरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्यांचं पहिलं सत्र 10 सप्टेंबर 2021 तर दुसरं सत्र 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होईल. पहिल्या वर्षाचे अभियात्रिंकीचे वर्ग सरु करण्याची अखेरची तारीख 25 ऑक्टोबर निश्चित करण्यात आलीय.

बी टेकच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिक्षणाची संधी

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेला आहे. एआयसीटीईकडून बी.टेकचे विद्यार्थी त्यांच्या मुख्य अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इंजिनीअरिंगच्या इतर शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकतात, असं जाहीर करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे अभियांत्रिकीच्या इतर शाखांमध्ये प्रवेश घेता येईल, असं सांगण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीवर निर्णय

बी.टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांकडून विनंत्या येत होत्या. बी. टेक आणि बी.ईच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या दुसऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. तसेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षामध्ये त्यांच्या महाविद्यालयात एखादी शाखा नसेल तर दुसऱ्या महाविद्यालयात ते दुसऱ्या शाखेत प्रवेश घेऊ शकतात.

इतर बातम्या:

GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘इथे’ पाहा वेळापत्रक

अकरावीच्या प्रवेशासाठी पहिल्या दिवशी 94 हजार ऑनलाईन अर्ज

AICTE released revised calendar for 2021-22 classes for first year technical courses

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.